आता बांग्लादेशातील नोटाही बदलणार, नव्या डिझाइनवर काम सुरू! कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 16:06 IST2024-12-06T16:03:30+5:302024-12-06T16:06:52+5:30

Bangladesh Currency : बांग्लादेशातील अंतरिम सरकारने देशाचे संस्थापक आणि राष्ट्रपिता शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो चलनी नोटांवरुन काढण्याचा निर्णय घेतला आहे.

Bangladesh Currency: Attempt to erase Sheikh Mujibur Rahman's identity; Bangladesh government to remove photos from currency notes | आता बांग्लादेशातील नोटाही बदलणार, नव्या डिझाइनवर काम सुरू! कारण काय?

आता बांग्लादेशातील नोटाही बदलणार, नव्या डिझाइनवर काम सुरू! कारण काय?

Bangladesh Currency : काही महिन्यांपूर्वी बांग्लादेशात हिंसाचार आणि तीव्र आंदोलनद्वारे शेख हसीना यांचे सरकार पाडण्यात आले. या हिंसाचारादरम्यान, अनेक ठिकाणी बांग्लादेशचे संस्थापक आणि राष्ट्रपिता शेख मुजीबुर रहमान यांचे पुतळेही पाडले गेले. हसीना सरकार पाडून बांग्लादेशात सत्तेवर आलेल्या अंतरिम सरकारने देशातून मुजीबुर रहमान यांची आठवण पुसून टाकण्याचा चंग बांधला आहे. यासाठीच आता बांग्लादेश सरकारने आपले चलन बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

बांग्लादेशातील मोहम्मद युनूस सरकारने आपल्या केंद्रीय बँकेला शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो चलनी नोटांवरुन हटवण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच नवीन डिझाइन केलेल्या नोटा जारी करण्यात येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन नोटांवर शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग सरकारची हकालपट्टी करणाऱ्या उठावापासून प्रेरित डिझाइन नोटा जारी केल्या जातील.

बांग्‍लादेश आर्मीने 'चिकन नेक' परिसरात तैनात केले किलर ड्रोन्स; भारत सरकार अलर्टवर

हा निर्णय म्हणजे, मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम प्रशासनाने बांग्लादेशची ओळख बदलण्याच्या प्रयत्नांचा एक भाग मानला जात आहे. बांग्लादेश बँकेने पुष्टी केली की, ते 20, 100, 500 आणि 1,000 टका(बांग्लादेशी चलन) मूल्यांच्या नवीन नोटा छापणार असून, या नोटांवर शेख मुजीबूर रहमान यांच्याऐवजी जुलै महिन्यातील आंदोलनाचा फोटो असेल. 

Web Title: Bangladesh Currency: Attempt to erase Sheikh Mujibur Rahman's identity; Bangladesh government to remove photos from currency notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.