Bangladesh: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचा विरोध झाला हिंसक; ढाक्यात तैनात केले बॉर्डर गार्ड्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 03:18 PM2021-03-27T15:18:24+5:302021-03-27T15:20:36+5:30

हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशात Facebook ही करण्यात आलं बॅन, पाच जणांचा झाला मृत्यू

Bangladesh deploys border guards after deadly anti pm narendra Modi protests sheikh haseena | Bangladesh: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचा विरोध झाला हिंसक; ढाक्यात तैनात केले बॉर्डर गार्ड्स

photo courtesy : AFP

googlenewsNext
ठळक मुद्देहिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशात Facebook ही करण्यात आलं बॅनपरिस्थिती नियंत्रणात असल्याची अधिकाऱ्यांची माहिती

सध्या भारताचे पंतप्रधाननरेंद्र मोदी हे बांगलादेश दौऱ्यावर गेले आहेत. दरम्यान, त्यांच्या या दौऱ्याला काही कट्टरपंथी लोकांनी विरोध केला आहे. कट्टरपंथी लोकांनी या त्यांच्या या दौऱ्याविरोधात आंदोलन सुरू केलं असून या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे.  या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये बॉर्डर गार्ड्स तैनात करावे लागले आहेत. शनिवारी एका अधिकाऱ्यानं यासंदर्भातील माहिती दिली. बांगलादेशची राजधानी ढाका येथील एका मशिदीतून शुक्रवारी सुरू झालेलं हे हिंसक आंदोलन हळहळू बांगलादेशच्या अनेक प्रमुख जिल्ह्यांमध्ये पसरलं. यामध्ये आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशमध्ये फेसबुकवरही बंदी घालण्यात आली आहे. युझर्सच्या तक्रारीनंतर शुक्रवारी मध्यरात्रीपासून फेसबुक बंद करण्यात आलं. कारण सोशल मीडियावर अनेक हिंसक फोटो आणि रिपोर्ट शेअर केले जात होते, असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे शुक्रवारी रात्रीपासूनच बांगलादेशच्या बॉर्डर गार्ड्सना तैनात करण्यात आल्याची माहिती बॉर्डर गार्ड बांगलादेशच्या प्रवक्त्यांनी दिली. बॉर्डर गार्ड बांगलादेश ही कायदा सुरव्यवस्था राखण्यासाठी एक आरक्षित एक निमलष्करी दल म्हणून काम करतं. 

परिस्थिती नियंत्रणात

"गृह मंत्रालयाच्या निर्देशांनुसार आणि नागरिक प्रशासनाच्या सहाय्यतेनं देशातील निरनिराळ्या भागांमध्ये आवश्यक त्या संख्येत बॉर्डर गार्ड्सना तैनात करण्यात आलं आहे. गार्ड्सच्या तैनातीनंतर कोणत्याही प्रकारची हिंसक घटना घडली नाही. सध्या संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे," अशी माहिती लेफ्टनंट कर्नल फैजुर रहमान यांनी एएफपीशी बोलताना दिली. दरम्यान, त्यांनी किती गार्ड तैनात करण्यात आले आहेत याबाबत मात्र माहिती दिली नाही. 

"कट्टरतावादी इस्लामिक समूह हेफाज़ात-ए-इस्लामच्या चार सदस्यांचे मृतदेह चटगांव येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आणण्यात आले. एका ग्रामीण भागात हिंसा भडकवल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला," अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानं दिली. तर दुसरीकडे यावर हेफाज़ात-ए-इस्लामकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली. शुक्रवारी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. या समुहानं शिवारी राष्ट्रव्यापी आंदोलन आणि रविवारी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात आंदोलनाचा इशारा या समुहाच्या प्रवक्त्यानं दिला. 

Web Title: Bangladesh deploys border guards after deadly anti pm narendra Modi protests sheikh haseena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.