"मी राजीनामा...",  बांगलादेशात हिंदू शिक्षकांकडून जबरदस्तीने घेतले जाताहेत राजीनामे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 02:16 PM2024-09-01T14:16:51+5:302024-09-01T14:54:54+5:30

Bangladesh Hindu Teachers Targeted : आता हल्ले आणि अत्याचाराचा सामना केल्यानंतर येथील हिंदूंना सरकारी नोकऱ्यांचा राजीनामा देण्यास भाग पाडले जात आहे.

Bangladesh Hindu Teachers Targeted, Minority Teachers Forced To Resign, Forced to Leave Job in Dhaka | "मी राजीनामा...",  बांगलादेशात हिंदू शिक्षकांकडून जबरदस्तीने घेतले जाताहेत राजीनामे

"मी राजीनामा...",  बांगलादेशात हिंदू शिक्षकांकडून जबरदस्तीने घेतले जाताहेत राजीनामे

Bangladesh Hindu Teachers Targeted : बांग्लादेशमध्ये आताही हिंसाचार सुरु आहे. गेल्या काही दिवसांत बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूवर हल्ले होत असल्याचे दिसून आले. आता हल्ले आणि अत्याचाराचा सामना केल्यानंतर येथील हिंदूंना सरकारी नोकऱ्यांचा राजीनामा देण्यास भाग पाडले जात आहे. ५ ऑगस्टपासून जवळपास ५० हिंदू शिक्षणतज्ज्ञांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले आहे.

यासंदर्भातील माहिती बांगलादेश छात्र एक्य परिषदेने शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. छात्र एक्य परिषद ही बांगलादेशातील हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन विद्यार्थ्यांची एक संघटना आहे. दरम्यान, 'आज तक' या वेबसाइटने राजीनामा दिलेल्या शिक्षकांची यादी मिळवली आहे. यानुसार, सरकारी बकरगंज कॉलेजच्या प्राचार्या शुक्ला रॉय यांनी राजीनामा दिल्याचा फोटोही समोर आला आहे. साध्या कागदावर "मी राजीनामा देत आहे" इतकच लिहून त्यांचा राजीनामा घेण्यात आला.

काही शिक्षकांनी 'आज तक'शी बोलताना बांगलादेशातील हिंदू शिक्षकांच्या राजीनाम्याला दुजोरा दिला.  म्हणाले, बांगलादेशातील काझी नजरुल विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक संजय कुमार मुखर्जी, "दादा, मी संजय कुमार मुखर्जी, सहयोगी प्राध्यापक, सार्वजनिक प्रशासन आणि प्रशासन अभ्यास विभाग, काझी नजरुल विद्यापीठ, बांगलादेश. मला प्रॉक्टर आणि  विभाग प्रमुख पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले गेले. आम्ही यावेळी खूप असुरक्षित आहोत."

बांगलादेशातील हिंदूंची स्थिती गंभीर
ढाका विद्यापीठातील गणित विभागाचे प्राध्यापक डॉ. चंद्रनाथ पोद्दार यांना विद्यार्थ्यांनी राजीनामा देण्यास भाग पाडले. ज्या शिक्षकांनी भीतीपोटी कॅम्पसमध्ये न येण्याचा निर्णय घेतला होता, त्यांना त्यांच्या घरी जावून अपमानित केले जात आहे. दरम्यान, ज्या शिक्षकांना जबरदस्तीने राजीनामा देण्यास भाग पाडले जात आहे. त्यामधील काहींची नावे खालील प्रमाणे....

सोनाली राणी दास - असिस्टंट प्रोफेसर, होली फॅमिली नर्सिंग कॉलेज
भुवेशचंद्र रॉय - प्राचार्य, पोलिस लाईन हायस्कूल अॅण्ड कॉलेज, ठाकूरगाव
सौमित्र शेखर – कुलगुरू, काझी नजरुल इस्लाम विद्यापीठ
रतनकुमार मजुमदार - प्राचार्य, पुराण बाजार पदवी महाविद्यालय, चांदपूर
मिहिर रंजन हलदर - कुलगुरू, कुवेत
आदर्श आदित्य मंडळ - प्राचार्य, कपोतक्ष महाविद्यालय, कोयर, खुलना
डॉ. सत्यप्रसाद मजुमदार - कुलगुरू, बुएट
केका रॉय चौधरी - प्राचार्य, व्हीएनसी
कंचन कुमार विस्वास - भौतिकशास्त्र शिक्षक, झेनैदह जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाविद्यालय
डॉ. दुलाल चंद्र रॉय - संचालक, आयक्यूएसी, आरयू
डॉ. प्रणवकुमार पांडे - जनसंपर्क प्रशासक, अरबी
डॉ.पुरंजित महालदार - सहाय्यक प्रॉक्टर, रबी
डॉ. रतन कुमार - सहाय्यक प्रॉक्टर, अरबी
डॉ.विजय कुमार देबनाथ - सथिया पायलट मॉडेल स्कूल, पबना
गौतम चंद्र पाल - सहाय्यक शिक्षक, अजीमपूर गव्हरर्नमेंट गर्ल्स स्कूल
डॉ. तापसी भट्टाचार्य - प्राचार्य, अन्वर खान मॉडर्न नर्सिंग कॉलेज
खुकी बिस्वास - प्रभारी, जेसोर कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मिडवाइफरी
डॉ. छयनकुमार रॉय - प्राचार्य, खान साहेब कमरुद्दीन कॉलेज (प्रोसेसिंग)

Web Title: Bangladesh Hindu Teachers Targeted, Minority Teachers Forced To Resign, Forced to Leave Job in Dhaka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.