Bangladesh : अजानच्या वेळी हिंदूना पूजा करता येणार नाही, बांगलादेशात युनूस सरकारने काढले फर्मान; आदेश पाळला नाहीतर कारवाई होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 03:17 PM2024-09-12T15:17:32+5:302024-09-12T15:22:37+5:30

Bangladesh : बांगलादेशात सत्तांत्तर झाल्यानंतर देशात अनेक बदल करण्यात आले आहेत.

Bangladesh Hindus cannot worship at the time of Azan, Yunus government issued a decree in Bangladesh Follow the order or action will be taken | Bangladesh : अजानच्या वेळी हिंदूना पूजा करता येणार नाही, बांगलादेशात युनूस सरकारने काढले फर्मान; आदेश पाळला नाहीतर कारवाई होणार

Bangladesh : अजानच्या वेळी हिंदूना पूजा करता येणार नाही, बांगलादेशात युनूस सरकारने काढले फर्मान; आदेश पाळला नाहीतर कारवाई होणार

Bangladesh : काही दिवसापूर्वी बांगलादेशात नोकरीतील आरक्षणावरुन निदर्शने सुरू होती. यामुळे देशात सत्तांत्तर झाले. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देशही सोडला. दरम्यान, आता बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आले आहे. या सरकारने देशात काही बदल केले आहेत. तर दुसरीकडे बांगलादेशात अल्पसंख्यांकांवर हल्ले सुरू असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी पावले उचलत असल्याचा दावा केला होता. पण, आता अंतरिम सरकारने आता तुघलकी फर्मान जारी केले आहे. 

खळबळजनक! आरजी कर हॉस्पिटलमध्ये आंदोलनाच्या ठिकाणी बेवारस बॅग, बॉम्ब स्क्वॉड दाखल

बांगलादेशात अजानच्या वेळी हिंदूंना आता पूजा करता येणार नाही. हिंदू समाजातील लोकांना अजान आणि नमाज दरम्यान भजन ऐकण्यास आणि लाऊडस्पीकर वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. अंतरिम सरकारचे गृह व्यवहार सल्लागार निवृत्त लेफ्टनंट जनरल मोहम्मद जहांगीर आलम चौधरी यांनी हा आदेश जारी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशच्या गृहमंत्रालयाने आदेश जारी केला आहे. या आदेशात म्हटले आहे की, जर कोणी या नियमांचे उल्लंघन करताना आढळले तर पोलीस त्याला कोणत्याही वॉरंटशिवाय अटक करतील.

अंतरिम सरकारने हिंदू समुदायाला दुर्गापूजेशी संबंधित विधी अजान आणि नमाज दरम्यान संगीत वाजवणे बंद करण्याचे आवाहन केले आहे. मोहम्मद जहांगीर आलम चौधरी म्हणाले की, पूजा समित्यांना वाद्ये आणि ध्वनी प्रणाली बंद ठेवण्यास सांगितले आहे आणि त्यांनी त्यास सहमती दर्शविली आहे.

मोहम्मद जहांगीर आलम चौधरी म्हणाले, यावर्षी देशभरात एकूण ३२,६६६ पूजा मंडप बांधले जाणार आहेत.  यापैकी १५७ मंडप ढाका दक्षिण शहरात आणि ८८ नॉर्थ सिटी कॉर्पोरेशनमध्ये असतील. शेख हसीना सरकार पडल्यानंतर बांगलादेशात शेकडो हिंदूंवर हल्ले झाले आहेत.

Web Title: Bangladesh Hindus cannot worship at the time of Azan, Yunus government issued a decree in Bangladesh Follow the order or action will be taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.