बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा उलटफेर होणार! शेख हसीनांचे जवळचे लष्करप्रमुख मोहम्मद युनूस यांचे पंख छाटण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 11:43 IST2025-02-27T11:38:04+5:302025-02-27T11:43:40+5:30
वकार-उझ-जमान हे शेख हसीना यांचे जवळचे मानले जातात. ते त्यांचे नातेवाईक असल्याचेही बोलले जाते.

बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा उलटफेर होणार! शेख हसीनांचे जवळचे लष्करप्रमुख मोहम्मद युनूस यांचे पंख छाटण्याच्या तयारीत
गेल्या वर्षी बांगलादेशध्ये मोठे राजकीय बदल झाले. शेख हसीना यांचे सरकार सत्तेवरुन गेले. सत्तापालटानंतर, मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने व्यवस्था ताब्यात घेतली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये शेख हसीना यांना देश सोडावा लागला होता, पण तेव्हापासून हिंसक घटना सुरूच आहेत. हिंदूंसह अल्पसंख्याक समुदायांविरुद्ध हिंसक घटना घडत असताना, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी कोणीही जबाबदार असल्याचे दिसून येत नाही. आता ज्या विद्यार्थी संघटनांच्या आवाहनावरून हे बंड घडले त्याच विद्यार्थी संघटनांमध्ये संघर्षाची परिस्थिती आहे. दरम्यान, आता बांगलादेश सैन्याने इशारा दिला आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर आपण सत्तेची सूत्रे हाती घेऊ शकतो, असं लष्कराने म्हटले आहे.
"अंतर्गत कलह आणि अराजकतेच्या परिस्थितीत लष्कराला आपली भूमिका वाढवावी लागेल, असंही बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान म्हणाले.
ढाका येथील आर्मी मेमोरियल कार्यक्रमाला बोलताना जनरल वकार यांनी हा इशारा दिला. "आपल्याला सर्व मतभेद विसरून जावे लागतील. आपल्याला सर्व चुकीचे विचार सोडून राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करावे लागेल.'जर तुम्ही तुमच्या मतभेदांपासून पुढे जाऊन आपापसात लढला नाही तर देशाची एकता आणि अखंडता धोक्यात येईल, असंही ते म्हणाले.
मध्यरात्री हादरली जमीन, उत्तरेकडील लोकांची झोप उडाली; मागील १० दिवसांपासून काय घडतंय?
"सर्व जबाबदार लोक एकमेकांवर चिखलफेक करत आहेत आणि याचा फायदा घेत समाजकंटक हिंसक घटना घडवत आहेत. आता देशाच्या अंतर्गत बाबी हाताळण्यासाठी आपल्याकडे कोणतेही काम नाही, पण जर परिस्थिती सुधारली नाही तर आपल्याला परत जावे लागेल, असंही वकार म्हणाले.
गेल्या काही दिवसापासून बांगलादेशात सत्ताधारी भागीदार बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि जमात-ए-इस्लामी यांच्यात वाद निर्माण झाला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप होत आहेत. बांगलादेशमध्ये लष्कर पूर्णपणे सत्ता हाती घेण्याची शक्यता नाही, पण जनरल जामा महत्त्वाची भूमिका बजावू शकतात हे नाकारता येत नाही. जर असे काही घडले तर बांगलादेशमध्ये पुन्हा खेळ बदलू शकतो.