बांगलादेशचे 'अच्छे दिन'! प्रती माणशी उत्पन्नात घसघशीत वाढ; भारताला टाकलं मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 11:01 AM2021-05-22T11:01:16+5:302021-05-22T11:05:12+5:30
कोरोना संकट काळात बांगलादेशची मोठी भरारी; बांगलादेशी झाले भारतीयांपेक्षा जास्त श्रीमंत
ढाका: संपूर्ण जग गेल्या एक ते दीड वर्षांपासून कोरोना संकटाचा सामना करत आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर कोट्यवधी लोकांना पगार कपात सहन करावी लागत आहे. व्यवसायिकांच्या उत्पन्नातही लक्षणीय घट झाली. मात्र याच कालावधीत बांगलादेशानं भरारी घेतली आहे. प्रती माणशी उत्पन्नाच्या बाबतीत बांगलादेशनं भारताला मागे टाकलं आहे. बांगलादेशी आणि भारतीय व्यक्तीच्या वार्षिक सरासरी उत्पन्नाची तुलना केल्यास आता भारत मागे पडला आहे.
मोदी टीव्हीवर येऊन रडणार; खासदाराची भविष्यवाणी १००% टक्के खरी ठरली; पाहा VIDEO
सरासरी वार्षिक उत्पन्नाचा आकडा लक्षात घेतल्यास बांगलादेशी नागरिकांचं उत्पन्न भारतीयांपेक्षा अधिक आहे. बांगलादेश १९७१ मध्ये स्वतंत्र झाला. त्यावेळी बांगलादेशची गणना सर्वाधिक गरिब राष्ट्रांमध्ये व्हायची. मात्र गेल्या काही वर्षांत बांगलादेशनं उत्पादन क्षेत्रावर विशेष लक्ष दिलं. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये बांगलादेशी नागरिकाचं सरासरी वार्षिक उत्पन्न २२२७ डॉलर म्हणजेच १.६२ लाख रुपयांवर पोहोचलं. गेल्या वर्षी बांगलादेशी नागरिकाचं वार्षिक उत्पन्न २०६४ डॉलर म्हणजेच १.४६ लाख रुपये होतं.
सीरम इन्स्टिट्यूटचे अधिकारी म्हणाले, "केंद्र सरकारला लसींच्या कमतरतेबद्दल माहिती होती, तरीही..."
प्रती माणसी उत्पन्नाच्या बाबतीत बांगलादेशनं भारताला मागे टाकलं आहे. भारतीय नागरिकांचं सरासरी वार्षिक उत्पन्न १९४७ डॉलर म्हणजेच १.४१ लाख रुपये आहे. भारत सरकारनं दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, कोरोना विषाणूमुळे फैलावलेल्या महामारीमुळे लॉकडाऊन लावण्यात आला. त्याचा परिणाम आर्थिक व्यवहारांवर झाला. त्यामुळे प्रती माणशी उत्पन्नात घट झाली. तर याच कालावधीत बांगलादेशमधील नागरिकांचं सरासरी वार्षिक उत्पन्न २२२७ डॉलरवर गेलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ ९ टक्के आहे.