बांगलादेशच्या पंतप्रधान निवासामध्ये आंदोलकांची हुल्लडबाजी, पलंगावर झोपले, लुटालूट केली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 07:48 PM2024-08-05T19:48:06+5:302024-08-05T19:49:33+5:30
Bangladesh Protests Updates: बांगलादेशमध्ये आज धक्कादायकरीत्या सत्तांतर होऊन पंतप्रधान शेख हसिना यांना पदाचा राजीनामा देत देशातूल पलायवन केले. हसिना पंतप्रधान निवासामधून बाहेर पडल्यानंतर आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा ताबा घेत तिथे यथेच्छ हुल्लडबाजी केली.
बांगलादेशमध्ये आज धक्कादायकरीत्या सत्तांतर होऊन पंतप्रधान शेख हसिना यांना पदाचा राजीनामा देत देशातूल पलायवन केले. हसिना पंतप्रधान निवासामधून बाहेर पडल्यानंतर आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा ताबा घेत तिथे यथेच्छ हुल्लडबाजी केली. यादरम्यान आंदोलकांनी ढाका पॅलेसमध्ये धुसूर शेख मुजीब उर रहमान यांचा पुतळा तोडला. तसेच पंतप्रधान निवासामधील साहित्याचीही लुटालूट केली.
शेख हसिना यांनी राजीनामा देऊन ढाका सोडल्याचं समजताच त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत असलेले आंदोलक बांगलादेशच्या पंचप्रधानांचं निवास्थान असलेल्या गानोभाबोनमध्ये घुसले. दुपारी तीनच्या सुमासार गानोभाबोनचे दरवाजे उघडताच आंदोलकांनी आत प्रवेश करून जल्लोष केला.
पंतप्रधानांच्या निवासस्थानामध्ये घुसलेल्या आंदोककांचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये हजारो लोक पंतप्रधानांच्या निवासस्थानामध्ये घुसताना दिसत आहेत. तसेच कुठल्याही भीतीचा लवलेश न बाळगता गोंधळ घालताना दिसत होते. तिथे कुणीही सुरक्षा रक्षक किंवा पोलीस दिसत नव्हते. आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानामधील खुर्च्या, सोफा सेट आदी सामान चोरून नेताना दिसत आहेत. एकजण तर तेथील टीव्ही काढून नेताना दिसत आहे. काही आंदोलक येथील पलंगावर झोपल्याचे, तर काही जण जेवणावर ताव मारताना दिसत आहेत.
बांगलादेशमधील पंतप्रधानांचं निवासस्थान हे गानोभाबोन म्हणून ओळखलं जातं. ते बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका येथे आहे. ते बांगलादेशच्या पंतप्रधानांचं अधिकृत निवासस्थान आहे. तसेच त्याचं ऐतिहासिक आणि राजकीय महत्त्व आहे. तसेच येथे नेहमी सरकारी बैठका आणि उच्चस्तरीय निर्णय होत असतात.