विद्यापीठांमध्ये अड्डा, विद्यार्थी आंदोलनाचा फायदा; जमात-ए-इस्लामीने रचली सत्तांतराची योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 02:50 PM2024-08-06T14:50:02+5:302024-08-06T14:50:49+5:30

बांग्लादेशातील शेख हसीना यांचे सरकार पडण्यामागे जमात-ए-इस्लामीचा हात असल्याची माहिती समोर आली आहे.

Bangladesh Sheikh Hasina Jamaat-e-Islami prepared a plan for transfer of power in Bangladesh | विद्यापीठांमध्ये अड्डा, विद्यार्थी आंदोलनाचा फायदा; जमात-ए-इस्लामीने रचली सत्तांतराची योजना

विद्यापीठांमध्ये अड्डा, विद्यार्थी आंदोलनाचा फायदा; जमात-ए-इस्लामीने रचली सत्तांतराची योजना

Bangladesh Sheikh Hasina : बांग्लादेशात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतपर्धान शेख हसीना यांनी काल(दि.6) आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि देशातून पलायन केले. त्यामुळेच आता बांग्लादेशात अंतरिम सरकार स्थापन झाले असून, यात सैन्य, पत्रकार, उद्योगपती, अर्थशास्त्री, राजकारणी अशा व्यक्तींचा समावेश असेल. दरम्यान, या सत्तांतरानंतर जमात-ए-इस्लामीची विद्यार्थी संघटना इस्लामिक स्टुडंट कॅम्पबाबत चर्चा सुरू झाली आहे. शेख हसीना यांचे सरकार उखडून टाकण्यात इस्लामिक स्टुडंट कॅम्पची सर्वात मोठी भूमिका आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या दोन वर्षांत बांग्लादेशातील विविध विद्यापीठांमध्ये इस्लामिक स्टुडंट कॅम्पच्या अनेक कॅडरची भरती करण्यात आली. येथूनच विद्यापीठातील विद्यार्थ्यांना भडकावण्याचे काम सुरू झाले. आरक्षणाविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे विद्यार्थी इस्लामिक स्टुडंट्स ऑर्गनायझेशनचे होते.

इस्लामिक स्टुडंट कॅम्पचा दबदबा
बहुतांश विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये इस्लामिक स्टुडंट कॅम्पचे वर्चस्व आहे. पण ढाका विद्यापीठ, चितगाव विद्यापीठ, जहांगीर विद्यापीठ, सिल्हेत विद्यापीठ आणि राजशाही विद्यापीठ हे त्याचे गड मानले जातात.

विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत जेएमबी समर्थकांचा विजय
बांग्लादेशातील बहुतेक मोठ्या विद्यापीठांमध्ये गेल्या 3 वर्षात निवडणुका जिंकलेल्या सर्व विद्यार्थी संघटनांचा या विद्यार्थी संघटनेला पाठिंबा आहे. विद्यार्थी राजकारणाव्यतिरिक्त ही संघटना मदरशांच्या कार्यातही सक्रिय सहभाग घेते. भारतात अटक करण्यात आलेले जेएमबीचे बहुतांश सदस्य जमात-ए-इस्लामी बांग्लादेशचे आहेत.

संघटनेचे हे प्रमुख नेते आहेत
नूरुल इस्लाम, बुलबुल मोहम्मद, नजरुल इस्लाम आणि कमाल अहमद सिकदर हे या संघटनेचे प्रमुख नेते आहेत. या संघटनेचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIशी अत्यंत सखोल संबंध आहेत आणि तिचे अनेक कार्यकर्ते पाकिस्तान आणि बांग्लादेशातही गेले आहेत.

इंडिया आऊट मोहीम राबविण्यात आली
मालदीवच्या धर्तीवर बांग्लादेशातही इंडिया आऊट मोहीम सुरू करण्यात आली. यामागे इस्लामिक स्टुडंट कॅम्पचा हात होता. या मोहिमेमागील संपूर्ण कट पाकिस्तान आणि त्याची गुप्तचर संस्था आयएसआयचा होता. यावेळी आयएसआयचे लोक विद्यार्थ्यांच्या नावाने आंदोलनात सामील झाले होते. 

आयएसआयएसने सत्ताबदलाची ब्लू प्रिंट तयार केली
गुप्तचर अहवालानुसार, लंडनमध्ये आयएसआयएसच्या मदतीनेच बांग्लादेशातील सत्तांतराची ब्लू प्रिंट तयार करण्यात आली होती. बांग्लादेशी अधिकाऱ्यांनी दावा केला होता की, त्यांच्याकडे तारिक रहमान आणि आयएसआयच्या अधिकाऱ्यांमध्ये सौदी अरेबियामध्ये झालेल्या बैठकीचे पुरावे आहेत. शेख हसीना यांचे सरकार कोसळण्यापूर्वी सरकारविरोधात 500 हून अधिक निगेटिव्ह ट्विट करण्यात आले होते. 

आंदोलक हसीना यांच्या राजीनाम्यावर ठाम होते
बांग्लादेशातील विद्यार्थी आरक्षणाविरोधात आंदोलन करत होते. हिंसक आंदोलनानंतर शेख हसीना सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या, मात्र त्यानंतरही त्यांनी आंदोलन संपवले नाही. शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी सुरू केली. वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर 5 ऑगस्ट रोजी शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि भारतात आश्रय घेतला. सध्या त्या हिंडन एअरबेसवरील सेफ हाऊसमध्ये आहेत.

Web Title: Bangladesh Sheikh Hasina Jamaat-e-Islami prepared a plan for transfer of power in Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.