पंतप्रधान मोदींचा दौरा संपताच बांगलादेशात मंदिरांवर हल्ले; हिंसक आंदोलनात १० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 07:37 PM2021-03-28T19:37:55+5:302021-03-28T19:41:11+5:30

बांगलादेशात उफाळला हिंसाचार; कट्टर इस्लामवादी गटांकडून मंदिरं लक्ष्य

bangladesh violence spreads after pm modi visit attacks on hindu temples | पंतप्रधान मोदींचा दौरा संपताच बांगलादेशात मंदिरांवर हल्ले; हिंसक आंदोलनात १० जणांचा मृत्यू

पंतप्रधान मोदींचा दौरा संपताच बांगलादेशात मंदिरांवर हल्ले; हिंसक आंदोलनात १० जणांचा मृत्यू

googlenewsNext

ढाका: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा दौरा संपताच बांगलादेशात हिंदू मंदिरांवर हल्ले (Attack on Hindu Mandir) होण्याचं सत्र सुरू झालं आहे. बांगलादेशात हिंसाचार उफाळून आला आहे. कट्टर इस्लामवादी गटाच्या शेकडो सदस्यांनी रविवारी पूर्व बांगलादेशातल्या हिंदू मंदिरांवर आणि एका ट्रेनवर हल्ला केला. मोदींच्या दौऱ्याविरोधात इस्लामी गटांनी आंदोलनं केली. यावेळी पोलीस आणि आंदोलक भिडले. यामध्ये १० आंदोलकांचा मृत्यू झाला. (bangladesh violence spreads after pm modi visit attacks on hindu temples)

बांगलादेशाच्या स्थापनेला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी उपस्थित होते. बांगलादेशच्या पंतप्रधान हसिना शेख यांच्याकडे कोरोना लसीचे १२ लाख डोस आणि १०९ रुग्णवाहिका सोपवून मोदी भारतात परतले. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. याशिवाय भारत आणि बांगलादेशात ५ करार झाले.

डझनभर लोक जखमी
पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात हिंदुबहुल भारतात अल्पसंख्याक मुस्लिमांवर भेदभाव होत असल्याचा आरोप आंदोलक इस्लामी समूहांनी केला. राजधानी ढाक्यात शुक्रवारी झालेल्या आंदोलनांमध्ये डझनभर लोक जखमी झाले. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रधुराचा आणि रबराच्या गोळ्यांचा वापर केला. मोदींच्या दौऱ्याच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी मुस्लिम कार्यकर्ते चितगाव आणि ढाक्यात रस्त्यावर उतरले.

Web Title: bangladesh violence spreads after pm modi visit attacks on hindu temples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.