बांगलादेश होणार मालामाल, आधी अमेरिका मग जागतिक बँक देणार २ अब्ज डॉलर्सची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 01:29 PM2024-09-18T13:29:06+5:302024-09-18T13:39:28+5:30
बांगलादेशला पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जागतिक बँक बांगलादेशला २ अब्ज अमेरिकी मदत देणार आहे.
गेल्या काही दिवसापासून बांगलादेशची परिस्थिती बिघडली आहे. आता बांगलादेशात सत्तांत्तर झाले आहे. दरम्यान, आता बांगलादेशासाठी जागतिक बँकेने मदतीची घोषणा केली आहे. चालू आर्थिक वर्षात बांगलादेशला २ अब्ज अमेरिकी डॉलर रक्कम देणार असल्याचे जागतिक बँकेने सांगितले. ही रक्कम बांगलादेशला महत्त्वाच्या सुधारणा, पूरस्थिती हाताळणे, हवेचा दर्जा चांगला यांसाठी देण्यात येणार आहे. मजबूत विकासासाठी आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधा दिल्या जातील.
जम्मू काश्मीरमध्ये भाजपला दिलासा, हिंदू मतदारांमध्ये उत्साह; ९ वाजेपर्यंत ११ टक्के मतदान
जागतिक बँकेचे प्रादेशिक संचालक अब्दुलाये सेक यांनी मंगळवारी ढाका येथे अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांच्याशी झालेल्या बैठकीत नवीन मदत देण्याचे आश्वासन दिले. "अंतरिम सरकारच्या सुधारणेच्या अजेंड्याला पाठिंबा देण्यासाठी जागतिक बँक चालू आर्थिक वर्षात बांगलादेशला दिलेले कर्ज वाढवणाप आहे आहे,असंही अब्दुलाये सेक म्हणाले.
मुख्य सल्लागारांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली. मोहम्मद युनूस यांनी ट्विटरवर लिहिले, "SEC नुसार, गंभीर सुधारणा, सुधारित हवा गुणवत्ता आणि आरोग्य सेवेवर काम करण्यासाठी जागतिक बँक चालू आर्थिक वर्षात अंदाजे २ अब्ज अतिरिक्त सहाय्य प्रदान करेल.
यापूर्वी अमेरिकेने बांगलादेशला २०० दशलक्ष डॉलर्सची मदतही दिली होती. बांगलादेशी अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, हा पैसा युवकांच्या कल्याणासाठी, आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आणि व्यवसायाच्या संधी वाढवण्यासाठी वापरला जाईल.
बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने होत असताना, पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून पळून जावे लागले, त्यानंतर बांगलादेशातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बिघडली. आंदोलकांनी पंतप्रधानांचे निवासस्थान आणि संसदेसह अनेक ठिकाणी तोडफोड केली. परिस्थिती चिघळल्याने हिंदू समाजावर अत्याचार होऊ लागले. देशातील अनेक प्रमुख हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करून जाळण्यात आली.