बांगलादेश भारताविरोधात इंटरपोलकडे धाव घेणार, तर समुद्रात चीनसाठी घातल्या पायघड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 04:22 PM2024-10-14T16:22:22+5:302024-10-14T16:22:59+5:30

Bangladesh News; बांगलादेशमधील मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकार एकीकडे भारतासोबत चांगल्या संबंधांची इच्छा व्यक्त करत आहे. तर दुसरीकडे भारतावर डोळे वटारण्याचीही आगळीक करत आहे.

Bangladesh will run to Interpol against India, while the shoes worn for China at sea | बांगलादेश भारताविरोधात इंटरपोलकडे धाव घेणार, तर समुद्रात चीनसाठी घातल्या पायघड्या

बांगलादेश भारताविरोधात इंटरपोलकडे धाव घेणार, तर समुद्रात चीनसाठी घातल्या पायघड्या

विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे सत्तांतर होऊन शेख हसिना सत्तेमधून पायउतार झाल्यानंतर बांगलादेशमधील राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. बांगलादेशमधील मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकार एकीकडे भारतासोबत चांगल्या संबंधांची इच्छा व्यक्त करत आहे. तर दुसरीकडे भारतावर डोळे वटारण्याचीही आगळीक करत आहे. आता तर बांगलादेशने भारताविरोधात इंटरपोलकडे मदत मागितली आहे. एवढंच नाही तर हिंदी महासागरामध्ये चिनी नौदलाच्या संशोधक जहाजाला येण्याची परवानगीही दिली आहे.

बांगलादेशच्या मुख्य सरकारी वकिलांचं एक वक्तव्य समोर आलं आहे. त्यात त्यांनी सत्तांतरानंतर भारतात आश्रयाला आलेल्या शेख हसिना यांना भारतातून  बांगलादेशमध्ये परत आणण्यासाठी आम्ही इंटरपोलची मदत घेऊ, असे सांगितले आहे. तत्पूर्वी आम्ही कोर्टाच्या माध्यमातून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहोत. त्यानंतर याबाबत इंटरपोलकडे धाव घेतली जाईल, असं त्यांनी सांगितलं आहे. बांगलादेशमधील मोहम्मद युनूस सरकारमध्ये एवढ्या महत्त्वपूर्ण पदावर बसलेली व्यक्ती वरिष्ठांच्या परवानगीशिवाय एवढं मोठं वक्यव्य करणार नाही, असं बोललं जात आहे.

आंदोलनामुळे सत्तेतून पायउतार झाल्यानंतर भारतात आश्रयाला आलेल्या शेख हसिना ह्या आतापर्यंत भारतामध्येच आहेत. त्यामुळे बांगलादेशी जनतेच्या मनातील नाराजी सातत्याने वाढत चालली आहे. त्यामुळे बांगलादेशमधील काळजीवाहू सरकारवर भारताविरोधात कारवाई करण्यासाठीचा दबाव वाढत आहे.  

दरम्यान, बांगलादेशकडून भारताच्या सुरक्षेला धोकादायक ठरेल असं आखणी एक पाऊल उचलण्यात आलं आहे. भारताकडून चीनच्या हिंदी महासागरातील घुसखोरीला सातत्याने अटकाव करण्यात येतो. मात्र आता मालदीवपाठोपाठ बांगलादेशने चिनी नौदलाला हिंदी महासागरामध्ये शिरकाव करण्याची परवानगी दिली आहे. चिनी नौदलाचा एक ताफा शनिवारी बांगलादेशमध्ये पोहोचला आहे.  त्या प्रसंगी चीनचे बांदलादेशमधील राजपूत याओ वेन यांनी सांगितले की, ढाकामध्ये हल्लीच राजकीय सत्ता परिवर्तन झालं असलं तरी चीन आणि बांगलादेमधील संबंध दृढ होत राहतील.  

Web Title: Bangladesh will run to Interpol against India, while the shoes worn for China at sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.