कोट्यवधी कमावणाऱ्या 'त्या' अधिकाऱ्याने कॅन्टीनमधून सॅन्डविच चोरी केलं त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 03:12 PM2020-02-04T15:12:39+5:302020-02-04T15:13:55+5:30
पारस शहा याच्या लिंक इन प्रोफाइलनुसार त्याला सुरक्षा, व्यापार आणि रिस्क मॅनजेमेंटचा अनुभव आहे.
लंडन - पैसे किंवा गाडी चोरीच्या घटना आपण अनेकदा ऐकल्या असतील पण लंडनमध्ये एक अनोखा प्रकार समोर आल्याचं पाहायला मिळालं आहे. ऑफिसच्या कॅन्टीनमधून सँडविच चोरुन नेल्याप्रकरणी एका उच्चस्तरीय बँकरला कंपनीने निलंबित केले आहे. ३१ वर्षीय पारस शहा याला वर्षाकाठी ९ कोटी रुपये पगार मिळतो. युरोप, मध्य पूर्व आणि आफ्रिका या शहरांच्या प्रमुखपदावरून शहाला कंपनीने काढून टाकले आहे.
फायनान्शियल टाईम्सच्या अहवालानुसार, बँकेने अनेक आरोपानंतर पारसला निलंबित केले, त्यातील एक ऑफिसच्या कॅन्टीनमधून अन्न चोरत होता. परंतु, पारसने कॅन्टीनमधून किती सँडविच चोरले याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही.
पारस शहा हा युरोपमधील सर्वात मोठा क्रेडिट व्यापाऱ्यांपैकी एक आहे. ग्लासडोर या कर्मचाऱ्यांसंबधित वेबसाईटनुसार सर्वसाधारणपणे, युरोपमधील एका क्रेडिट व्यापाराचे वेतन 183,740 पौंड (सुमारे 1 कोटी रुपये) किंवा त्याहून अधिक असते, परंतु पारस शहाचा पगार यापेक्षा जास्त होता कारण तो सिटी बँकेत होता. उच्च पदाच्या पदावर कार्यरत होता. डेली मेलच्या अहवालानुसार एका बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, इतर बँकांमध्ये या पदावर अधिकाऱ्यांना दहा लाख पौंड (सुमारे 9 कोटी रुपये) पर्यंत पगार मिळतो.
पारस शहा याच्या लिंक इन प्रोफाइलनुसार त्याला सुरक्षा, व्यापार आणि रिस्क मॅनजेमेंटचा अनुभव आहे. पारस शहा यानी २०१० साली बाथ विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदवी संपादन केली. यानंतर, त्याने एचएसबी बँकेत 7 वर्षे काम केले आणि 2017 मध्ये त्यांनी सिटी बँकेत काम करण्यास सुरवात केली. सिटीबँकमध्ये नोकरी लागल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांनी पारस शहाला युरोप, मध्य पूर्व आणि आफ्रिका येथे हाय-यील्ड क्रेडिट ट्रेनिंगचा प्रमुख बनविण्यात आले.