बापरे... इमारत की आगीची फुलझडी! दुबईत गगनचुंबी इमारत पेटली, Video पहाल तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 02:05 PM2023-06-27T14:05:41+5:302023-06-27T14:08:54+5:30

एका फ्लोअरला लागलेली आग पार अगदी वरच्या फ्लोअरपर्यंत पसरली की अख्खी इमारतच रात्रीच्या अंधारात पेटती दिसत होती. 

Bapre... building or fire flower! A skyscraper caught fire in Dubai, if you watch the video... | बापरे... इमारत की आगीची फुलझडी! दुबईत गगनचुंबी इमारत पेटली, Video पहाल तर...

बापरे... इमारत की आगीची फुलझडी! दुबईत गगनचुंबी इमारत पेटली, Video पहाल तर...

googlenewsNext

हायफाय, काचांच्या गगनचुंबी इमारती या दुरूनच चांगल्या वाटतात. संयुक्त अरब अमिरातीतील एका अशाच मोठ्या इमारतीचा आगीच्या घटनेचा हा व्हिडीओ पहाल तर हादरून जाल. एका फ्लोअरला लागलेली आग पार अगदी वरच्या फ्लोअरपर्यंत पसरली की अख्खी इमारतच रात्रीच्या अंधारात पेटती दिसत होती. 

अजमानच्या एका निवासी इमारतीला सोमवारी रात्री ही आग लागली होती. अजमान वन कॉम्प्लेक्सच्या दोन नंबरच्या टॉवरला ही आग लागली होती. फायर डिपार्टमेंट आणि पोलिसांनी मिळून ही आग नियंत्रणात आणली. पोलिसांनुसार अद्याप या घटनेत कोणी जखमी झाल्याची माहिती मिळालेली नाही. 

उंच इमारतीला आग लागल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आगीमुळे इमारतीचे खाली पडत असलेले भागही दिसत आहेत. इमारतीखाली काही लोक उभे असल्याचे दिसत आहे. एकंदरीत या व्हिडीओतून या गगनचुंबी इमारती किती धोकादायक आहेत हे दिसत आहे. 

गेल्या काही वर्षांमध्ये इमारतींच्या आगीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा इशारा गृह मंत्रालयाच्या अहवालात दिल्यानंतर सुमारे तीन दिवसांनी ही घटना घडली आहे. नागरी संरक्षण संघांनी 2022 मध्ये 3,000 हून अधिक घटना हाताळल्या. यापैकी 2,169 इमारतींना आग लागली होती. तर 2021 मध्ये 2,090 व 2020 मध्ये 1,968 इमारतींना आग लागली होती. 

Web Title: Bapre... building or fire flower! A skyscraper caught fire in Dubai, if you watch the video...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.