२६/११ नंतर मनमोहन सिंगांनी पाकविरोधात कारवाई करण्यास टाळटाळ केली; ओबामांचा दावा
By कुणाल गवाणकर | Published: November 17, 2020 10:15 PM2020-11-17T22:15:33+5:302020-11-17T22:16:22+5:30
ओबामांच्या पुस्तकामुळे भारतात राजकारण तापलं
वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या नव्या पुस्तकामुळे भारतातील राजकारण तापू लागलं आहे. मुंबईवरील २६/११ हल्ल्यानंतर विद्यमान पंतप्रधान मनमोहन सिंगपाकिस्तानविरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते, असा दावा ओबामांनी पुस्तकात केला आहे. मनमोहन सिंग यांना त्यांच्या धोरणाचे राजकीय परिणाम भोगावे लागले, असंदेखील ओबामांनी पुस्तकात नमूद केलं आहे.
ओबामांनी त्यांच्या A promised land पुस्तकात भारतातल्या अनेक राजकीय घटना आणि पडद्यामागे घडलेल्या घडामोडींचा उल्लेख केला आहे. 'देशातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रभावामुळे मुस्लिम विरोधी भावना वाढत असल्याची भीती त्यांना (मनमोहन सिंग यांना) वाटत होती,' असं ओबामांनी पुस्तकात म्हटलं आहे. 'राजकीय पक्षांमधील कटुता, विविध फुटिरतावादी आंदोलनं, भ्रष्टाचार, घोटाळे असूनही आधुनिक भारताची कहाणी बरीच सफल झाली,' असं ओबामांनी पुस्तकात नमूद केलं आहे.
...म्हणून सोनिया गांधींनी मनमोहन सिंगांना बनवलं होतं पंतप्रधान; बराक ओबामांनी सांगितली मोठी गोष्ट!
जागतिकीकरण आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा विस्तार यावर ओबामांनी पुस्तकातून प्रकाश टाकला आहे. '१९९० च्या दशकात भारतीय अर्थव्यवस्था आणखी बाजार केंद्रीत झाली. त्यामुळे भारतीयांची असामान्य उद्यमशीलता, कौशल्यं समोर आली. विकासदर वाढीस लागला. तंत्रज्ञान क्षेत्र विस्तारलं. याचा थेट फायदा मध्यमवर्गाला झाला,' असं निरीक्षण ओबामांनी पुस्तकात नोंदवलं आहे.
राहुल गांधी यांचे वर्तन उतावीळ विद्यार्थ्यासारखे- बराक ओबामा
२००८ पासूनचा निवडणूक प्रचार ते अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून पहिला कार्यकाळ संपेपर्यंत घडलेल्या घटनांचा उल्लेख ओबामांनी पुस्तकात केला आहे. अलकायदा प्रमुख ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यासाठी केलेल्या कारवाईची माहितीदेखील पुस्तकात आहे. ओबामांच्या पुस्तकाचे २ भाग आहेत. यातील पहिला भाग मंगळवारी जगभरात प्रसिद्ध झाला.
डॉ. मनमोहनसिंग अतिशय प्रामाणिक, ओबामांच्या पुस्तकातील 'मन की बात'
आर्थिक सुधारणांसाठी मनमोहन सिंग यांचं कौतुक
बराक ओबामांनी त्यांच्या पुस्तकात मनमोहन सिंग यांच्या आर्थिक धोरणांचं कौतुक केलं आहे. 'भारतीय अर्थव्यवस्थेत झालेल्या बदलांमध्ये मनमोहन सिंग यांची भूमिका निर्णायक होती. अल्पसंख्यांक शीख समुदायात जन्मलेले मनमोहन सिंग देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचले. त्यांनी आपल्या आयुष्यात अतिशय उच्च मापदंड निर्माण केले. आपली भ्रष्टाचारमुक्त प्रतिमा निर्माण करून त्यांनी लोकांची मनं जिंकली,' अशी स्तुतीसुमनं ओबामांनी मनमोहन यांच्यावर उधळली आहेत.