बराक ओबामांचा मुखवटा घालून त्याने लुटले दुकान
By admin | Published: November 1, 2014 01:49 AM2014-11-01T01:49:12+5:302014-11-01T01:49:12+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचा मुखवटा घालून मॅसॅच्युसेटस्मधील एका दुकानात बंदुकीचा धाक दाखवून लूट करणा:या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.
कपिल केकत गोंदिया
भारतीय नागरिकासाठी अनेक कामांसाठी अधिकृत ओळखपत्र म्हणून महत्वपूर्ण दस्तावेज म्हणून ‘आधार कार्ड’ कार्ड बनविण्याची मोहीम गेल्या दोन ते अडीच वर्षापेक्षा अधिक काळापासून जिल्ह्यात सुरू आहे. मात्र अलिकडे कार्ड बनविण्यासाठी राबविण्यात येत असलेली ही मोहीम थंडावत चालल्याचे दिसून येत आहे. परिणामी जिल्ह्यातील ४४ हजार ८०० नागरिकांकडे अजूनही आधार कार्ड नसल्याची माहिती उजेडात आली आहे. यासाठी नागरिकांची अनास्था आणि प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.
सन २०११ मध्ये आधार कार्ड हे नवीन ओळखपत्र शासनाने काढले. निवडणूक असो की अन्य शासकीय कामकाज, देशात कोणत्याही व्यक्तीला त्याची ओळख सिद्ध करावयाची असल्यास आधार कार्ड दाखवावे लागणार असे शासनाकडूनच सांगितले जात होते. त्यानुसार महत्वपूर्ण दस्तावेज म्हणून प्रत्येकाने आपले आधार कार्ड तयार करून घ्यावे यासाठी शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणात जाहिरात केली जात होती. कार्ड तयार करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिबिरे घेण्यात आली. जिल्हाच काय, ग्रामस्तरावरही आधार कार्डाबाबत जनजागृती करून नागरिकांना कार्ड बनविण्यासाठी प्रोत्साहित केले जात होते.
जिल्हास्तरावर बघायचे झाल्यास, सन २०११ मध्ये जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख २२ हजार ६३५ एवढी होती व या आधारावर आधार कार्ड तयार करण्यासाठी मोहीम राबविण्यात आली.
आता सप्टेंबर महिन्यातील आकडेवारीनुसार यातील १२ लाख ७७ हजार ८३५ नागरिकांनी आधार कार्ड नोंदणी केली आहे. मात्र ४४ हजार ८०० नागरिकांनी अद्याप आधार कार्डसाठी नोंदणीच केली नसल्याचे दिसून येते. एकंदर जिल्ह्यातील ९६ टक्के नागरिकांनी आधार कार्ड नोंदणी करवून घेतली असून चार टक्के नागरिक आधार कार्डपासून दूरच आहेत.
शासनाने सुरूवातीला नागरिकांना कार्ड बनवून घेण्यासाठी जाहिरातींच्या माध्यमातून पूर्ण ताकद पणाला लावली. मात्र आजघडीला साधे पोस्टरसुद्धा कुठे दिसून येत नाही. परिणामी नागरिकही कार्ड बनविण्यासाठी गंभीर दिसून येत नाही. शिवाय जिल्ह्यात आता नाममात्र आधार नोंदणी केंद्र सुरू असल्याने ग्रामीण भागातील नागरिक तालुकास्थळावर जाऊन कार्डसाठी नोंदणी करण्यास इच्छूक दिसत नाहीत.