बराक हुसेन ओबामा हे इसिसचे संस्थापक : ट्रम्प
By admin | Published: August 12, 2016 03:15 AM2016-08-12T03:15:20+5:302016-08-12T03:15:20+5:30
मध्यपूर्वेकडील देश ते युरोपियन शहरांत हिंसाचाराने हाहा:कार माजविणाऱ्या इस्लामिक स्टेटची (आयएस) स्थापना ओबामा यांनी केल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे
सनराईज (फ्लोरिडा) : मध्यपूर्वेकडील देश ते युरोपियन शहरांत हिंसाचाराने हाहा:कार माजविणाऱ्या इस्लामिक स्टेटची (आयएस) स्थापना ओबामा यांनी केल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. त्यांनी अध्यक्षांचा उल्लेख त्यांचे पूर्ण नाव ‘बराक हुसेन ओबामा’ अशा शब्दांत केला.
‘‘अनेक बाबींमध्ये ते अध्यक्ष ओबामा यांचा सन्मान करतात,’’ असे ट्रम्प फ्लोरिडातील फोर्ट लौडेरडेल येथील प्रचार सभेत बोलताना म्हणाले. ते म्हणाले, ‘‘ते इसिसचे संस्थापक आहेत.’’ त्यांनी हा आरोप तीन वेळा करून आपल्या मुद्यावर भर दिला. ट्रम्प यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी डेमोकॅॅ्रटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यावर त्या अतिरेकी गटाच्या संस्थापक असल्याचा आरोप केला होता. आता बुधवारी त्यांनी हा ठपका बराक ओबामा यांच्यावर ठेवला. ते म्हणाले, ‘‘कपटी हिलरी क्लिंटन या प्रत्यक्षात गटाच्या सह संस्थापक आहेत.’’ ट्रम्प यांनी ओबामा आणि त्यांच्या एकेकाळच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांच्यावर मध्यपूर्वेवरील धोरणाबाबत ठपका ठेवला आहे. (वृत्तसंस्था)