नवाज शरीफांकडून बु-हान वाणीचं उदात्तीकरण, 'युवा नेता' असा केला उल्लेख

By admin | Published: September 21, 2016 11:49 PM2016-09-21T23:49:33+5:302016-09-22T07:11:38+5:30

कश्मिरमध्ये भारताकडून मानवाधिकाराचं उल्लंघन होत आहे, तेथील जनतेवर अत्याचार केले जात आहेत. नव्या पिढीला स्वातंत्र्य हवं आहे.

Bau Han Wani's glorification was done by Nawaz Sharif, a 'young leader' | नवाज शरीफांकडून बु-हान वाणीचं उदात्तीकरण, 'युवा नेता' असा केला उल्लेख

नवाज शरीफांकडून बु-हान वाणीचं उदात्तीकरण, 'युवा नेता' असा केला उल्लेख

Next
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. २१ : काश्मीरमध्ये भारताकडून मानवाधिकांराचं उल्लंघन होत असून, तेथील जनतेवर अत्याचार केले जात आहेत. काश्मीरमधील  नव्या पिढीला स्वातंत्र्य हवं आहे, असे वादग्रस्त वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केले आहे. भारताविरुद्ध त्यांनी पुन्हा एकदा गरळ ओकली आहे.

पाकिस्तानात दहशतवादाने हजारो लोकांचे बळी गेले आहेत, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे. ते संयुक्त राष्ट्र सभेत बोलत होते. पंतप्रधान नवाज शरीफ यांनी बु-हान वाणीला 'युवा नेता' संबोधून त्याचं उदात्तीकरण करण्याचाही प्रयत्न केला आहे. बुहरान वानी काश्मीरचा आवाज आहे. भारताने अलिकडेच काश्मीरमध्ये युवा नेते बु-हान वाणी याची हत्या केली. काश्मीरमध्ये होत असलेल्या हत्यांसाठी स्वतंत्र चौकशी करावी, अशी माझी मागणी आहे, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

दहशतवाद हा जागतिक प्रश्न आहे. काश्मीरमधून सैन्य हटवण्याची गरज आहे. आम्ही संयुक्त राष्ट्रांचे अध्यक्ष 'बान की मून' यांचे स्वागत करतो, असं वक्तव्य नवाज शरीफ यांनी केलं. भारताने चर्चेसाठी अनावश्यक अटी ठेवल्या आहेत. चर्चा पाकिस्तानच्या बाजूने नाही तर दोन्ही देशांच्या हिताच्या दृष्टीने व्हायला हवी. सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही भारताला पुन्हा चर्चेचं आवाहन करतो. काश्मीरचा मुद्दा सोडवला जात नाही तोपर्यंत भारत आणि पाकिस्तानात शांतता नांदणार नसल्याचंही ते म्हणाले आहेत. 
 

Web Title: Bau Han Wani's glorification was done by Nawaz Sharif, a 'young leader'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.