पोस्ट शेअर करताना सावधान, फेसबुक करेल अकाउंट डिलीट

By admin | Published: February 22, 2017 09:15 PM2017-02-22T21:15:05+5:302017-02-22T21:16:05+5:30

फेसबुकवर एखादी भावनिक पोस्ट पाहून तिची शहानिशा न करता शेअर करायची किंवा लाइक करायची सवय असेल

Be careful while sharing posts, Facebook will delete the account | पोस्ट शेअर करताना सावधान, फेसबुक करेल अकाउंट डिलीट

पोस्ट शेअर करताना सावधान, फेसबुक करेल अकाउंट डिलीट

Next
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 22 - फेसबुकवर एखादी भावनिक पोस्ट पाहून तिची शहानिशा न करता शेअर करायची किंवा लाइक करायची सवय असेल तर आता खबरदारी घ्या. अशाच एका घटनेमध्ये फेसबुकने लंडनमधील दोन जणांचे अकाउंट डिलीट केले आहे. 
 
एका चिमुकल्या आजारी मुलाच्या फोटोला लाईक आणि शेअर करा त्यामुळे फेसबुक त्याच्या उपचाराचा खर्च उचलेल अशी पोस्ट त्या दोघांनी केली होती. या दोघांनी एका लहान मुलाचा फोटो चोरून फेसबुकवर खोटी पोस्ट केली होती. चिमुकल्याच्या आईने तक्रार केल्यानंतर फेसबुकने त्यांचे अकाउंट डिलीट केले. 
 
माझ्या मुलाचा फोटो चोरून चुकीचा संदेश पसरवण्यात येत आहे अशी तक्रार महिलेने केली होती. महिलेचा मुलगा 2 वर्षांचा होता त्यावेळी त्याला कांजण्या झाल्या होत्या त्यावेळचा एक फोटो या दोघांनी शेअर केला, आणि मुलाच्या फोटोला लाईक आणि शेअर करा त्यामुळे फेसबुक चिमुकल्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देईल अशी पोस्ट ते व्हायरल करत होते. त्यानंतर फेसबुकने त्या दोघांचं अकाउंट डिलीट केलं.  

Web Title: Be careful while sharing posts, Facebook will delete the account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.