कमी मित्र असणे हुशार असण्याचं लक्षण
By Admin | Published: March 25, 2016 11:18 AM2016-03-25T11:18:03+5:302016-03-25T13:01:39+5:30
एका रिसर्चनुसार कमी मित्र असणे हे हुशार असण्याचं लक्षण आहे. त्यामुळे माणूस जास्त तणावाखाली येत नाही आणि आनंदी राहतो
>ऑनलाइन लोकमत -
लंडन, दि. २५ - अनेकजण मला जास्त मित्र नसल्याची तक्रार करत असतात. जास्त मित्र नसल्याने अनेकजणांना आपण एकटे असल्याची भावना येत असते. तुम्ही तुमचा खुप वेळ मला जास्त मित्र का नाहीत असा विचार करण्यात घालवता का ? असं असेल तर मग तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही जर फक्त तुमच्या मोजक्या मित्रांसोबत वेळ घालवत असाल आणि त्यातून जर तुम्हाला आनंद मिळत असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. एका रिसर्चनुसार कमी मित्र असणे हे हुशार असण्याचं लक्षण आहे. त्यामुळे माणूस जास्त तणावाखाली येत नाही आणि आनंदी राहतो.
ब्रिटिश जरनल ऑफ सायकॉलॉजीने केलेल्या रिसर्चनुसार कमी मित्र असणारे लोक हे इतरांपेक्षा जास्त बुद्धिमान असतात. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि सिंगापूर मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीच्या मानसशास्त्रज्ञ सतोषी आणि नोरमन ली यांनी हा रिसर्च केला आहे. 18 ते 28 वयोगटातील 15 हजार जणांवर हा रिसर्च करण्यात आला आहे.
या रिसर्चमध्ये त्यांनी आपल्या पुर्वजांचा दाखला दिला आहे. आपले पुर्वंज ज्या वातावरणात, परिस्थितीत राहिले त्यामुळे ते जीवनात आनंदी होते आणि याचा फायदा आपल्याला आजच्या काळात कसा होऊ शकतो याबद्दल यामध्ये सांगण्यात आलं आहे.
या रिसर्चमध्ये दोन निष्कर्ष प्रामुख्याने काढण्यात आले आहेत. खुप लोकवस्ती असणा-या ठिकाणी राहणारी लोक कमी समाधानी आणि आनंदी होती. तर जे लोक आपल्या फक्त आपल्या जवळच्या मित्रांशीच संवाद साधायची ते जास्त आनंदी राहायचे. याचा अर्थ आपल्या आजुबाजूला असणा-या मोजक्याच लोकांशी किंवा मित्रांच्या सानिध्यात राहिल्यास आपण आनंदी आणि तणावमुक्त असतो असं या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे.