एकटे नाही, मिळून लढू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 06:12 PM2020-03-30T18:12:15+5:302020-03-30T18:12:50+5:30
आफ्रिका खंड मागास म्हणून ओळखला जातो, अनेक ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात भीषण संघर्ष आहे, पण कोरानानं त्यांनाही आपला संघर्ष तात्पुरता का होईना, मिटवायला भाग पाडलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक या प्रo्नावर एकत्र येताहेत आणि जनतेच्या भल्यासाठी काही करू पाहताहेत.
- लोकमत
‘आता काय होईल आपलं?’, या भीतीची छाया संपूर्ण जगावर पसरलेली आहे. प्रत्येक जण घाबरलेला आहे आणि या काळात प्रत्येकाला सक्तीनं एकमेकांपासून दूर राहावं लागत असलं, तरी अनेक जण एका मानसिक पातळीवर एकत्रही येत आहेत. कोरोनाच्या या संकटाचा मुकाबला करायचा, तर एकट्यानं लढून फायदा नाही, दुसर्याची साथ आपल्याला हवीच, ही भावनाही अनेकांच्या मनात आकार घेते आहे. त्यामुळेच जगभरातील नेतेही आपापसातले मतभेद दूर ठेऊन एकत्रितपणे यावर उपाय शोधण्याचा प्रय} करताहेत. त्याचाच एक भाग म्हणजे आफ्रिका खंडातील देश. हा संपूर्ण खंडच मागास म्हणून ओळखला जातो, अनेक ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात भीषण संघर्ष आहे, पण कोरानानं त्यांनाही आपला संघर्ष तात्पुरता का होईना, मिटवायला भाग पाडलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक या प्रo्नावर एकत्र येताहेत आणि जनतेच्या भल्यासाठी काही करू पाहताहेत.
युगांडात प्रचंड लाकप्रिय असलेला बॉबी वाइन हा पॉपस्टार. सरकारचा तो प्रखर विरोधक आणि राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांचा प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धीही आहे.
आपल्या पॉप म्युझिकमुळे बॉबी युगांडात, विशेषत: तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्याचं मूळ नाव रॉबर्ट क्यागुलयानी सेंटामू, पण म्युझिकसाठी त्यानं बॉबी वाइन हे नाव धारण केलं आहे.
कोरोनाच्या काळात सरकार आणि जनतेला मदत म्हणून त्यानं नुकताच एक म्युझिक व्हिडीओ तयार केला आहे. खरंतर कोरोनाचा प्रतिकार कसा करायचा, यासंबंधीचं हे साधंसुधं गाणं, पण त्याचा ठेकाच इतका आकर्षक आहे, की युगांडामध्ये ते अल्पावधीत प्रचंड पॉप्युलर झालं. प्रत्येकाच्या तोंडी सध्या हेच गाणं आहे.
‘कोरोना व्हायरस संपूर्ण मानवजातीलाच नष्ट करायला निघाला असताना आपण सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे’ या अर्थाचा त्याच्या गाण्याचा मुखडा. बॉबी म्हणतो, या गाण्याचा मुखडा म्युझिकवर म्हणत तुम्ही फक्त साबणानं हात धुवा. तेवढय़ा काळात बरोब्बर वीस सेकंद झालेले असतील! लोकांनी बॉबीचा हा सल्ला अक्षरश: मनावर घेतल्यानं हजारो लोक आता हे गाणं म्हणता म्हणता साबणानं हात धुवत आहेत.
https://youtu.be/PUHrck2g7Ic यूट्यूबच्या या लिंकवर हे अफलातून गाणं तुम्हालाही ऐकता येईल आणि त्यावर तुम्हीही नक्कीच ठेका धराल.
युगांडाप्रमाणेच केनियातील ऐतिहासिक विरोधी पक्षनेता रैला ओडिंगा यांनीही आपला व्हिडीओ ऑनलाइन प्रसारित केला आहे. त्यात त्यांनी जनतेला आवाहन केलं आहे की, कोरोनामुळे संपूर्ण मानवजातीलाच धोका आहे. त्यापासून जपा. दक्षिण आफ्रिकेत राष्ट्राध्यक्ष सिरील रामाफोसा यांना त्यांचे प्रमुख विरोधक ज्युलिअस मालेमा यांनीही साथ देताना लोकांना आवाहन केलं आहे, की सरकारचं ऐका. घरातून बाहेर पडू नका. पारंपरिक दुष्मनी ही सध्या अशी दोस्तीत बदलली आहे.