भिकारी घेतो डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे पैसे

By admin | Published: February 3, 2017 12:38 AM2017-02-03T00:38:16+5:302017-02-03T00:38:16+5:30

भिकाऱ्यांशी बहुदा कुठे ना कुठे गाठ पडतेच. पण, असा भिकारी कदाचित तुम्ही कुठे पाहिला नसेल. अमेरिकेतील सर्वात मोठीआॅटो इंडस्ट्री असलेल्या डेट्रॉइट शहरामध्ये फूटपाथवर

The beggar takes money through debit-credit card | भिकारी घेतो डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे पैसे

भिकारी घेतो डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे पैसे

Next

डेट्रॉइट : भिकाऱ्यांशी बहुदा कुठे ना कुठे गाठ पडतेच. पण, असा भिकारी कदाचित तुम्ही कुठे पाहिला नसेल. अमेरिकेतील सर्वात मोठीआॅटो इंडस्ट्री असलेल्या डेट्रॉइट शहरामध्ये फूटपाथवर राहणाऱ्या या ४२ वर्षीय हायटेक इसमाचे नाव आहे के. के. एब हँगनस्टोन. त्याला स्वत:चे घर नाही. तो तिथेच कायम असतो. खिशात आता पैसे नाहीत किंवा सुटे पैसे नाहीत असे सांगून याच्यापासून सुटका करून घेता येत नाही. कारण, तो तत्काळ खिशातून एक मशिन लोकांच्या समोर ठेवतो. या मशिनच्या माध्यमातून के्रडिट अथवा डेबिट कार्डव्दारे पैसे देता येतात. हा माणूस मागील अनेक वर्षांपासून डेट्रॉइटमध्ये भीक मागत आहे. लोक सुट्या पैशांचे कारण सांगू लागले तेव्हा त्याने ही मशिन खरेदी केले. ट्रॅफिकमध्ये ग्रीन सिग्नल पडेपर्यंत ते ही क्रेडिट वा डेबिट कार्डाने भीक देण्याची प्रक्रिया पूर्ण करतात. आता बोला? सुटे पैसे नाहीत? तर, करा कार्ड स्वाइप.

Web Title: The beggar takes money through debit-credit card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.