ओबामांच्या ऐतिहासिक क्युबा दौ-याला सुरुवात
By admin | Published: March 21, 2016 05:54 PM2016-03-21T17:54:41+5:302016-03-21T17:54:41+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या ऐतिहासिक तीन दिवसीय क्युबा दौ-याला सुरुवात झाली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
हवाना, दि. २१ - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या ऐतिहासिक तीन दिवसीय क्युबा दौ-याला सुरुवात झाली आहे. ओबामा क्युबाचे राष्ट्राध्यक्ष राउल कॅस्ट्रो यांची पॅलेस ऑफ रेव्हॉल्युशनमध्ये भेट घेणार आहेत. ही ओबामा आणि राउल कॅस्ट्रो यांची चौथी भेट असेल.
१५ महिन्यांपूर्वी दोन्ही नेत्यांची पहिली भेट झाली. त्यावेळी दोघांनी शीतयुद्धापासून चालू असलेले वाद संपवण्याचा निर्णय घेतला. सेव्हीत रशियाचे विघटन झाल्यानंतरही क्युबा आणि अमेरिकेमध्ये शीत युद्ध सुरुच होते. क्युबा आणि अमेरिकेमध्ये व्दिपक्षीय चर्चा सुरु करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे.
ओबामांचा हा दौरा ऐतिहासिक असला तरी, त्यांच्यावर दबावही आहे. क्युबामध्ये अधिकाधिक आर्थिक, लोकशाही सुधारणा आणि क्युबन नागरीकांना जास्तीत जास्त इंटरनेट वापरता यावे हा ओबामांच्या दौ-यामागचा उद्देश आहे. अमेरिकेने क्युबावर लादलेल्या आर्थिक निर्बंधांविषयीही चर्चा होणार आहे.