शाही परिवाराच्या वागणुकीमुळे आत्महत्येचा विचार होता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 02:13 AM2021-03-09T02:13:42+5:302021-03-09T02:14:09+5:30

युवराज हॅरी यांच्या पत्नी मेगनने केला गौप्यस्फोट

The behavior of the royal family led to suicidal thoughts | शाही परिवाराच्या वागणुकीमुळे आत्महत्येचा विचार होता

शाही परिवाराच्या वागणुकीमुळे आत्महत्येचा विचार होता

Next

लंडन : आमच्या मुलाचा रंग काळा असेल, अशी चिंता ब्रिटनच्या शाही परिवाराला लागली होती. या विचारांमुळे निराश होऊन माझ्या मनात आत्महत्येचे विचार घोळत होते, असा गौप्यस्फोट ब्रिटनचे युवराज हॅरी यांच्या पत्नी मेगन मर्केल यांनी केला आहे. मेगन यांचे वडील गौरवर्णीय व आई कृष्णवर्णीय आहे.
प्रख्यात अमेरिकी सूत्रसंचालक ओपरा विन्फ्रे यांना मेगन व हॅरी यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. त्यात मेगनने ब्रिटनच्या शाही परिवाराची अनेक गुपिते उघड केली आहेत. युवराज हॅरी व त्यांची पत्नी मेगन हे आता ब्रिटनच्या शाही परिवारापासून वेगळे झाले आहेत. हॅरी यांच्याशी मेगन यांचा २०१८ साली विवाह झाला व त्यांना आर्ची नावाचा एक वर्षे वयाचा मुलगा आहे.

मेगन यांनी सांगितले की, मी शाही परिवारातील मंडळींवर विश्वास ठेवला, ही सर्वात मोठी चूक होती. आमचा मुलगा आर्ची काळ्या रंगाचा निपजेल, अशी भीती वाटत असल्याने, शाही परिवाराने त्याला ‘युवराज’ म्हणून घोषित केले नव्हते. परिवारातील सदस्यांची ही मते मला युवराज हॅरी यांच्याकडून कळायची. प्रतिकूल मते व्यक्त करणाऱ्यांची नावे सांगण्यास मात्र मेगन मर्केल यांनी नकार दिला. युवराज विल्यम यांची पत्नी केट मिडल्टन यांच्याशी कोणताही वाद झाला नसल्याचेही मेगन यांनी स्पष्ट केले. 
या मुलाखतीवर ब्रिटनच्या राजघराण्याने काहीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. 

वडील माझा फोनही घेत नव्हते
युवराज हॅरी म्हणाले की, ब्रिटनच्या शाही परिवाराने आमच्याशी आर्थिक संबंध तोडले. त्यानंतर, वडील युवराज प्रिन्स यांनी माझे फोनही घेणे बंद केले. शाही परिवाराने आम्हाला सतत कमी लेखले.

Web Title: The behavior of the royal family led to suicidal thoughts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Londonलंडन