रोमानियातील भ्रष्टाचार संदर्भातील ‘तो’ अध्यादेश मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2017 01:53 AM2017-02-05T01:53:17+5:302017-02-05T01:53:17+5:30
येत्या १० फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून लागू होणारा भ्रष्टाचार संदर्भातील नवा अध्यादेश शासनाने मागे घेतला.
Next
>ऑनलाइन लोकमत
रोमानिया, दि. 05 - येत्या १० फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून लागू होणारा भ्रष्टाचार संदर्भातील नवा अध्यादेश शासनाने मागे घेतला.
१ फेब्रुवारीला अध्यादेश बाबत घोषणा केल्यानंतर नागरिकांनी देशभरात प्रचंड निदर्शने करण्यास सुरुवात केली. नव्या अध्यदेशानंतर ४७,५०० डॉलर्सपेक्षा कमी रक्कमेच्या लाचलुचपतीचा गुन्हा समजण्यात येणार नव्हता.
नागरिकांचा प्रचंड विरोध पाहून पंतप्रधान सोरीन ग्रिंड्यू यांनी देशाची फाळणी करावयाची नाही असे मत व्यक्त करुन अध्यादेश मागे घेण्याची घोषणा केली.