पृथ्वीपासून लाखो किमी अंतरावरील लघुग्रहास धडकावले यान!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 08:05 AM2022-09-29T08:05:10+5:302022-09-29T08:05:26+5:30

नासाच्या डार्ट मिशनचे अवकाश यान पहाटे ४.४५ वा. डिमोफोर्स नावाच्या एका लघुग्रहास धडकले.

Behold the 1st images of DART s wild asteroid crash nasa | पृथ्वीपासून लाखो किमी अंतरावरील लघुग्रहास धडकावले यान!

पृथ्वीपासून लाखो किमी अंतरावरील लघुग्रहास धडकावले यान!

Next

वॉशिंग्टन : अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाने मंगळवारी पृथ्वी पासून लाखो किलोमीटर दूर असलेल्या एका लघुग्रहास (ॲस्टेरॉइड) अंतराळ यान धडकावण्याची कामगिरी फत्ते करून दाखवली आहे. नासाच्या डार्ट मिशनचे अवकाश यान पहाटे ४.४५ वा. डिमोफोर्स नावाच्या एका लघुग्रहास धडकले. या टक्करीत अवकाश यान नष्ट झाले आहे.

पृथ्वीसाठी धोका बनलेल्या एखाद्या लघुग्रहाची अथवा अंतराळ खडकांची दिशा धडक देऊन बदलता येऊ शकते का, हे पाहण्यासाठी नासाने डार्ट मिशन हाती घेतले आहे. १६० किलोमीटर रुंदी असलेल्या डिमोफोर्सला धडक देईपर्यंत नासाचे यान प्रत्येक सेकंदाला एक छायाचित्र पृथ्वीवर पाठवत होते.

मनुष्य जातीच्या नव्या युगाची सुरुवात
नासाच्या प्लॅनेटरी सायन्सच्या संचालिका डॉ. लोरी ग्लेज यांनी सांगितले की,हे मोठे यश आहे. आम्ही मानव जातीच्या नव्या युगाची सुरुवात करीत आहोत. या युगात आम्ही घातक लघुग्रहाची दिशा बदलण्यास सक्षम असू आमच्याकडे आधी क्षमता नव्हती.

डिमोफोर्सवरील परिणामाचा अभ्यास बाकी 

  • अमेरिकेच्या जॉन्स हापकिन्स विद्यापीठाच्या अप्लाइड फिजिक्स प्रयोगशाळेने सांगितले की, धडकेच्या आधी डार्टच्या कॅमेऱ्यात डिमोफोर्स दिसला, तेव्हा नियंत्रण कक्षातील लोक आनंदाने नाचू लागले. 
  • मिशनच्या यशस्वीतेचा अंदाज घेण्यास थोडा अवधी लागेल. सध्या अंतराळ यान धडकले एवढेच ठामपणे सांगितले जाऊ शकते. लघुग्रहाची दिशा बदलली का, याचा अभ्यास केला जाईल.

Web Title: Behold the 1st images of DART s wild asteroid crash nasa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.