जगातील सगळ्यात मोठे विमानतळ बीजिंगमध्ये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 03:28 AM2017-11-06T03:28:09+5:302017-11-06T03:28:10+5:30
जगातील सगळ्यात मोठे विमानतळ ‘बीजिंग न्यू एअरपोर्ट’ चीनमध्ये २०१९मध्ये वापरात येईल. या विमानतळाच्या बांधकामासाठी ८० अब्ज युआन (९.१ अब्ज पौंड) खर्च आला आहे.
बीजिंग : जगातील सगळ्यात मोठे विमानतळ ‘बीजिंग न्यू एअरपोर्ट’ चीनमध्ये २०१९मध्ये वापरात येईल. या विमानतळाच्या बांधकामासाठी ८० अब्ज युआन (९.१ अब्ज पौंड) खर्च आला आहे. विमानतळाचा आकार अतिप्रचंड आकाराच्या फुलासारखा असून, ते दक्षिण डॅक्सिंग जिल्ह्यात आहे.
हे विमानतळ चायना सदर्न एअरलाइन्स आणि चायना ईस्टर्न एअरलाइन्सच्या विमानांसाठी
तळ म्हणून वापरले जाईल. या तळामुळे दोन उड्डाणांदरम्यान प्रवाशांना सहजपणे प्रवेश मिळेल. त्याची क्षमता जास्तीतजास्त १०० दशलक्ष प्रवाशांना हाताळण्याची अपेक्षित आहे. तथापि, पहिल्या टप्प्यात दरवर्षी ७२ दशलक्ष प्रवाशांना तेथे सेवा मिळेल.
विमानतळाच्या इमारतीचा नकाशा दिवंगत झाहा हादीद यांनी तयार केला असून, विमानतळावर देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणेही हाताळली जातील.
५२ हजार टन पोलाद आणि सुमारे १.६ दशलक्ष क्युबिक मीटर्स काँक्रिट त्यासाठी वापरण्यात
आले आहे. विमानतळाच्या सांगाड्याचा विस्तार ४७ चौरस किलोमीटर आहे. बीजिंगमधील सध्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार या नव्या विमानतळामुळे बºयापैकी कमी होईल. बीजिंग विमानतळ दरवर्षी जगातील दुसºया क्रमांकाच्या प्रवासी वाहतुकीला हाताळणारे आहे.