लठ्ठ असल्याने पतीने दिला धोका, पत्नीने केली कमाल

By admin | Published: February 7, 2017 11:28 AM2017-02-07T11:28:06+5:302017-02-07T11:28:06+5:30

ह्यूस्टन येथे राहणारी 34 वर्षीय बेट्सी आयला लठ्ठपणामुळे त्रस्त झाल्या होत्या. 2013 मध्ये मुलगी इसाबेला हिचा जन्म झाल्यानंतर त्यांचं वजन वाढतच चाललं होतं

Being threatened by husband is threatened, wife has done maximum | लठ्ठ असल्याने पतीने दिला धोका, पत्नीने केली कमाल

लठ्ठ असल्याने पतीने दिला धोका, पत्नीने केली कमाल

Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 7 - ह्यूस्टन येथे राहणारी 34 वर्षीय बेट्सी आयला लठ्ठपणामुळे त्रस्त झाल्या होत्या. 2013 मध्ये मुलगी इसाबेला हिचा जन्म झाल्यानंतर त्यांचं वजन वाढतच चाललं होतं.  बेट्सी  यांचं वजन 118 किलोवर पोहोचलं होतं. सहा महिन्यानंतर आपल्या पतीचं दुस-या महिलेशी अफेअर असल्याचं बेट्सी यांना कळलं. इतकंच नाही तर आपल्या वजनावरुन खिल्ली उडवलं जात असल्याचंही तिला समजलं. यामुळे बेट्सी खूप दुखावल्या गेल्या. 
 
मार्केटिंग मॅनेजर असणा-या बेट्सी यांनी आपल्या बहिणीसोबत वर्कआऊट करण्यास सुरुवात केली. नियमितपणे डाएट फॉलो करण्यासही त्यांनी सुरुवात केली. बेट्सी आठवड्यातून सहा दिवस जीमला जाऊ लागल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 118 वरुन त्यांनी आपलं वजन 55 किलोवर आणलं. 
 
आपल्या पतीने धोका देणं आपल्यासाठी एक वरदान ठरलं असल्याचं बेट्सी सांगतात. यामुळे अपेक्षा होती त्याप्रमाणे आपल्याला एक नवीन सुरुवात मिळाली असल्याचंही त्या सांगतात. 'खरं सांगायचं तर माझ्या पतीचं हे अफेअर माझ्यासाठी चांगलंच उपयोगाचं ठरलं. नाहीतर कदाचित मी अशीच राहिली असती', असं बेट्सी बोलल्या आहेत. 

Web Title: Being threatened by husband is threatened, wife has done maximum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.