Beirut Blast: बैरुत स्फोटात 78 जणांचा मृत्यू, 4000 जखमी; आरोग्य मंत्र्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 08:06 AM2020-08-05T08:06:17+5:302020-08-05T08:29:18+5:30
दुपारी झालेल्या स्फोटाने बैरुत शहरातील अनेक भाग हादरले.
लेबननची राजधानी असललेल्या बैरुतमध्ये मंगळवारी संध्याकाळी दोन भीषण स्फोट झाले. या घटनेत जवळपास 78 ठार तर 4000 जण जखमी झाल्याची माहिती आरोग्य मत्र्यांनी दिली आहे. या स्फोटांचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे हा स्फोट इतका तीव्र होता की, घराच्या खिडक्या, फॉल्स सिलिंग तुटल्या. बेरुतच्या पत्तननजीक हा स्फोट झाला असावा असा अंदाज आहे. दुपारी झालेल्या स्फोटाने बैरुत शहरातील अनेक भाग हादरले. ठिकठिकाणांहून धूरांचे प्रचंड लोळ निघत होते. या स्फोटाने संपूर्ण शहराच प्रचंड घबराट पसरली होती.
Extraordinary footage of the explosion of Beirut. pic.twitter.com/yBEGzwYeGv
— Saad Mohseni (@saadmohseni) August 4, 2020
हे स्फोट पोर्ट भागात झाले. वर्षभारापूर्वी अतिसंवेदनशील स्फोटकं आणि साहित्य जप्त करण्यात आली होती. ही स्फोटकं एका ठिकाणी ठेवण्यात आली होती. त्यांचा स्फोट झाला असावा, अशी शक्यता लेबनानच्या गृहमंत्र्यांनी व्यक्त केलीय. तर कित्येक टन नायट्रेटचा स्फोट झाल्याची माहिती सीमा शुल्क (customs) विभागाचे संचालकांनी दिली, असं लेबननाच्या माध्यमांकडून वृत्त देण्यात येत आहे.
BREAKING:
— RT (@RT_com) August 4, 2020
Massive explosion rocks #Beirut, cause unknown
MORE: https://t.co/k001zUvFumpic.twitter.com/VS9yh5InCl