डोंगरावर फोटो काढत होती पत्नी, ५ सेकंदात पतीच्या नजरेसमोरून झाली गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 11:52 AM2021-11-04T11:52:38+5:302021-11-04T11:55:09+5:30
'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, ३३ वर्षीय जो स्नोक्स लक्जमबर्ग प्रांतातील नाद्रिन भागात आपला पती जोएरी जानसेनसोबत फिरायला गेली होती.
बेल्जिअममध्ये (Belgium) डोंगरावर उभी राहून फोटो काढत असताना महिलेचा १०० फूट खोल खाली पडून (Fell From Cliff) वेदनादायी मृत्यू झाला. महिलेचा पती तिचा फोटो काढत होता. यादरम्यान ही घटना झाली. चला जाणून घेऊ कशी घडली ही घटना....
'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, ३३ वर्षीय जो स्नोक्स (Zoe Snoeks) लक्जमबर्ग प्रांतातील नाद्रिन भागात आपला पती जोएरी जानसेनसोबत फिरायला गेली होती. हे दोघे नेहमीच फिरायला जात होते आणि फोटोशूट करत होते. यादरम्यान स्नोक्स एका उंच डोंगरावर झाली होती आणि पती जानसेन तिचा फोटो काढत होता.
पाय घसरला आणि...
फोटो काढत असताना महिलेसोबत ही दुर्घटना घडली. अचानक पाय घसरल्याने ती १०० फूट खाली नदीत जाऊन पडली. जशी पती नजर तिच्यावर पडली त्याने लगेच इमरजन्सी सर्व्हिलला कॉल केला. काही वेळातच पोलीस, बचाव दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. एक मेडिकल हेलिकॉप्टरही घटनास्थळी पोहोचलं. बऱ्याच शोधानंतर स्नोक्सचा मृतदेह सापडला.
फक्त पाच सेकंदाच खेळ खल्लास
स्नोक्सचा पती जानसेन म्हणाला की, आम्ही टूरवर निघालो होतो. कोरोना महामारीनंतर आपल्या कारने ड्राइव्ह करणं आणि सुंदर फोटो काढण्याची आमची इच्छा होती. ज्या दिवशी स्नोक्सचा मृत्यू झाला तेव्हा आम्ही डोंगरावरच उभे होतो.
पत्नी फोटो काढत होती, तेव्हाच तिने मला मागे असलेल्या कुत्र्याला बघायला सांगितलं. मी कुत्र्याला बघण्यासाठी मागे वळलो आणि काही सेकंदाने पुन्हा स्नोक्सकडे पाहिलं तर ती तिथे नव्हती. ५ सेकंदाचा वेळ असेल, ती खाली पडली होती. जानसेन म्हणाला की, मी काही पाहिलं किंवा ऐकलं नाही. काही आवाज नाही, ओरडणं नाही.