ब्रिटनसोबत व्यापारात फायदा?

By admin | Published: June 30, 2016 03:51 AM2016-06-30T03:51:04+5:302016-06-30T03:51:04+5:30

ब्रेक्झिटनंतर ब्रिटन भारतासोबत थेट द्विपक्षीय व्यापार समझोता करण्याची शक्यता आहे.

Benefit in trading with Britain? | ब्रिटनसोबत व्यापारात फायदा?

ब्रिटनसोबत व्यापारात फायदा?

Next


सिंगापूर : ब्रेक्झिटनंतर ब्रिटन भारतासोबत थेट द्विपक्षीय व्यापार समझोता करण्याची शक्यता आहे. उभय देशांतील संबंधात तेजी आणण्यासाठी असे केले जाण्याची शक्यता आहे.
‘डेव्हलपमेंट बँक आॅफ सिंगापूर’च्या (डीबीएस) एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात ब्रिटनने युरोपीय महासंघात राहावे की नाही, याबाबत सार्वमत घेण्यात आले होते. त्यात ५१.९ टक्के लोकांनी युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते.
सध्या ब्रिटन युरोपीय संघात असल्याने भारताला त्या देशाशी स्वतंत्र करार करता येत नाही. आता ब्रिटन खरोखरच युरोपीय महासंघातून बाहेर पडल्यास भारताला त्या देशाशी स्वतंत्र करार करता येईल. त्याचा भारताला फायदा होण्याचीच शक्यता आहे, असे डीबीएसचे म्हणणे आहे.
भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यात प्रदीर्घ काळापासून मुक्त व्यापार कराराबाबत चर्चा सुरू आहे. आता भारताला ब्रिटनशी स्वतंत्र व्यापार करण्याचा एक पर्याय उपलब्ध होणार आहे. उभय देश स्वतंत्र व्यापार समझोता करू शकतात. (वृत्तसंस्था)

Web Title: Benefit in trading with Britain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.