Benjamin Netanyahu: इस्रायलमध्ये विरोधकांची एकजूट; बेंजामिन नेतन्याहू यांचे सरकार कोसळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 03:17 PM2021-05-31T15:17:57+5:302021-05-31T15:19:21+5:30

Benjamin Netanyahu: नेतन्याहू यांच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या पक्षाने विरोधी पक्षांसोबत चर्चा सुरू केल्याचे बोलले जात आहे.

benjamin netanyahu rival efforts to form new coalition government in israel | Benjamin Netanyahu: इस्रायलमध्ये विरोधकांची एकजूट; बेंजामिन नेतन्याहू यांचे सरकार कोसळणार?

Benjamin Netanyahu: इस्रायलमध्ये विरोधकांची एकजूट; बेंजामिन नेतन्याहू यांचे सरकार कोसळणार?

Next
ठळक मुद्देइस्रायलमध्ये विरोधकांची एकजूटइस्रायलला पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न - बेनेटहा इस्रायलच्या नागरिकांसोबत धोका - नेतन्याहू

तेल अवीव: गाझा-पॅलेस्टाइनसोबतचा शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर आता पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना देशांतर्गत संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. इस्रायलमध्ये विरोधकांची एकजूट झाली असून, आगामी कालावधीत नेतन्याहू सरकार कोसळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. नेतन्याहू यांच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या पक्षाने विरोधी पक्षांसोबत चर्चा सुरू केल्याचे बोलले जात आहे. (benjamin netanyahu rival efforts to form new coalition government in israel) 

बेंजामिन नेतन्याहू हे मागील १२ वर्षांपासून इस्रायलचे पंतप्रधान आहेत. इस्रायलमध्ये मागील दोन वर्षात चार वेळेस निवडणुका पार पडल्या आहेत. मात्र, बहुमतासाठी आवश्यक असणारा आकडा कोणत्याही एका पक्षाला गाठता आला नाही. त्यामुळे आघाडी सरकार स्थापन झाले आहे. इस्रायलचे राष्ट्रवादी नेते नफ्लाली बेनेट यांनी युती सरकारमध्ये सहभागी होऊ शकतात, असे जाहीर केले आहे. त्यामुळे आता एक तपाहून अधिक काळ इस्रायलमध्ये असलेले बेंजामिन नेतन्याहू सरकार जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

तुम्हाला वास्तविकतेचं भान नाही; ‘कोविन’वरून सुप्रीम कोर्टाने केंद्राला सुनावले

इस्रायलला पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न

नफ्लाली बेनेट यांनी म्हटले आहे की, माझे मित्र याइर लॅपिड यांच्यासोबत युती सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. दोन्ही पक्ष मिळून इस्रायलच्या अनियंत्रित अधोगतीला थांबवण्याचा तसेच देशाला पूर्वपदावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे बेनेट यांनी म्हटले आहे. याइर लॅपिड यांना बुधवारपर्यंत सरकार स्थापन करण्यास सांगितले आहे. 

हा इस्रायलच्या नागरिकांसोबत धोका

नवीन सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्यानंतर बेंजामिन नेतन्याहू यांनी प्रतिक्रिया दिली. नवीन सरकार स्थापनेच्या हालचाली म्हणजे इस्रायलच्या नागरिकांसोबत धोका आहे. देश सध्या संकटातून जात असून राजकारण करण्याची ही वेळ नाही, असे नेतन्याहू यांनी म्हटले आहे. मार्च महिन्यात झालेल्या निवडणुकीत नेतन्याहू यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. मात्र, त्यांना बहुमत गाठता आले नाही. 

दरम्यान, नफ्ताली बेनेट हे बेंजामिन नेतन्याहू यांचे जवळचे सहकारी समजले जातात. नेतन्याहू यांच्या सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदही सांभाळले आहे. त्याशिवाय वेस्ट बँकच्या मुद्याबाबत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, असे सांगितले जाते. 
 

Web Title: benjamin netanyahu rival efforts to form new coalition government in israel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.