हिजबुल्लाहला नेतन्याहू घाबरले? मुलाचे लग्न स्थगित केले! दहशतवादी संघटनेच्या नव्या प्रमुखानं सांगितली इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 12:49 PM2024-10-31T12:49:01+5:302024-10-31T12:50:01+5:30
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हिजबुल्लाह आणि इराणच्या हल्ल्याच्या भीतीने आपल्या मुलाचे लग्न स्थगित केल्याचे वृत्त आहे...
इस्रायल आणि इराण समर्थित हिजबुल्लाह यांच्यात जबरदस्त युद्ध सुरू आहे. इस्रायल हिजबुल्लाच्या ठिकानांवर जोरदार बॉम्बिंग करत आहे. मात्र, हिजबुल्लाह देखील इस्रायलला आव्हान देत सर्व शक्तीनिशी हल्ले करत आहे. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हिजबुल्लाह आणि इराणच्या हल्ल्याच्या भीतीने आपल्या मुलाचे लग्न स्थगित केल्याचे वृत्त आहे.
इस्रायली माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बेंजामीन नेतन्याहून यांचा मुलगा अवनेर याचे लग्न 26 नोव्हेंबर रोजी उत्तर तेल अवीवमधील एका भागात होणार होते. यासंदर्भात, नेतन्याहू यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत बोलताना म्हटले आहे की, "इस्रायल"ने छेडलेल्या बहुपक्षीय युद्धामुळे आणि विशेषतः उत्तरेकडील ड्रोनच्या धोक्यामुळे लग्नाचे आयोजन करणे धोकादायक ठरू शकते.
हिजबुल्लाहच्या नव्या प्रमुखाची इच्छा -
यातच, हिजबुल्लाच्या नव्या प्रमुखाने आपली इच्छाही व्यक्त केली आहे. आपण बरेच दिवस लढू शकतो परंतु युद्धविरामासाठी तयार आहेत, असे हिजबुल्लाचा प्रमुख नइम कासिमने म्हटले आहे. बुधवारी दहशतवादी संघटनेचा प्रमुख म्हणून आपल्या पहिल्या टेलीव्हिजन भाषणादरम्यान नइम म्हणाला, हसन नसराल्लाहच्या पावलावर पाऊल ठेवत चालण्याचा आपला मानस आहे. यावेळी त्याने पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कैसरिया येथील घरावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचाही उल्लेख केला आहे. तसेच, यात नेतन्याहू बचावले, कदाचित त्यांची वेळ अद्याप आलेली नाही," असेही त्याने म्हटले आहे.
हिजबुल्लाहने नेतन्याहू यांच्या घरावरही केला होता हल्ला... -
महत्वाचे म्हणजे, याच महिन्याच्या सुरुवातीला हिजबुल्लाहने ड्रोनच्या सहाय्याने नेतन्याहू यांच्या घराला निशाणा बनवले होते. यात नेतन्याहू यांच्या बेडरूमच्या खिडकीचे नुकसान झाले होते. यासाठी नेतन्याहू यांनी इराणच्या एजन्ट्सना दोषी ठरवले होते.