व्हिएन्ना रहाण्यासाठी जगातील सर्वोत्तम शहर
By admin | Published: February 24, 2016 01:53 PM2016-02-24T13:53:13+5:302016-02-24T14:02:55+5:30
ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना शहर रहाण्यासाठी जगातील सर्वोत्तम ठिकाण असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. २४ - ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना शहर रहाण्यासाठी जगातील सर्वोत्तम ठिकाण असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. १८ व्या मरसर क्वालिटी ऑफ लाईफच्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार व्हिएन्ना रहाण्यासाठी जगातील सर्वोत्तम ठिकाण असून, त्याखालोखाल झ्युरिच, ऑकलंड, म्युनिच आणि व्हॅनकोवर या शहरांचा क्रमांक लागतो.
खेदाची बाब म्हणजे या यादीतील पहिल्या शंभर शहरांमध्ये भारताील एकाही शहराला स्थान मिळालेले नाही. २३० जागतिक शहरांमधील सामाजिक, आर्थिक स्तराचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क या जगप्रसिध्द शहरांना पहिल्या तीसमध्येही स्थान मिळवता आलेले नाही. या सर्वेक्षणामध्ये इराकमधील बगदाद शहराची जगातील सर्वात वाईट शहर म्हणून नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान भारतीय शहरांमध्ये हैदराबाद सर्वात वर १३९ व्या स्थानी, पुणे १४४, बंगळूरु १४५, चेन्नई १५०, मुंबई १५२, कोलकत्ता १६० आणि दिल्ली १६१ व्या स्थानी आहे. या सर्वेक्षणामध्ये सामाजिक, आर्थिक स्तराबरोबरच आरोग्य, शिक्षण, निवासव्यवस्था आणि पर्यावरण या मुद्यांचाही अभ्यास करण्यात आला.