चीनच्या आव्हानांचा थेट मुकाबला करणार- बायडेन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 06:36 AM2021-02-06T06:36:23+5:302021-02-06T06:38:16+5:30
US-China News : चीनने निर्माण केलेल्या आव्हानांचा अमेरिका थेट मुकाबला करणार आहे; परंतु त्याचबरोबर देशहितासाठी बिजींगबरोबर मिळून काम करण्यास कधीही कचरणार नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे.
वॉशिंग्टन : चीनने निर्माण केलेल्या आव्हानांचा अमेरिका थेट मुकाबला करणार आहे; परंतु त्याचबरोबर देशहितासाठी बिजींगबरोबर मिळून काम करण्यास कधीही कचरणार नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे.
विदेश मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना फॉगी बॉटम मुख्यालयात संबोधित करताना बायडेन यांनी म्हटले आहे की, आम्ही चीनच्या आर्थिक शोषणाचा मुकाबला करणार आहोत. मानवाधिकार, बौद्धिक संपदा व जागतिक शासनावर चीनचे हल्ले कमी करण्यासाठी दंडात्मक कारवाई करणार आहोत. चीनबाबत आपल्या प्रशासनाचे धोरण कसे राहील, याचे संकेत देताना त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेच्या हितासाठी बिजींगबरोबर मिळून काम करण्यासही तयार आहोत. आम्ही आपल्या सहयोगी तसेच भागीदारांबरोबर काम करून आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये आपल्या भूमिकेला नवीन रूप देऊन आपली विश्वसनीयता व नैतिक अधिकार पुन्हा प्राप्त करणार आहोत. आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेची भागीदारी बहाल करणे तसेच समान आव्हानांवर काम करणे सुरू केले आहे. यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांनी सांगितले होते की, चीनच्या आर्थिक शोषणाचा मुकाबला करण्याला आमचे प्राधान्य आहे.