Blast: पाकिस्तानच्या कराची शहरात मोठा स्फोट; आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू तर १५ जखमी
By प्रविण मरगळे | Published: October 21, 2020 11:01 AM2020-10-21T11:01:53+5:302020-10-21T11:02:35+5:30
Blast in Pakistan News: सर्व जखमी आणि मृतांना पटेल रुग्णालयात नेण्यात आलं आहे. अद्याप स्फोटाचे कारण समजू शकले नाही
पाकिस्तानच्या कराचीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. गुलशन-ए-इकबालमध्ये मसकन चौरंगी येथे दुमजली इमारतीत स्फोट होऊन अनेक लोक जखमी झाले. आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या आहेत. पाकिस्तानी मीडिया डॉनच्या मते, या स्फोटात ३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १५ हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले की सर्व जखमी आणि मृतांना पटेल रुग्णालयात नेण्यात आलं आहे. अद्याप स्फोटाचे कारण समजू शकले नाही. मात्र, मुलिना टाऊन पोलिसांच्या एसएचओने सांगितले की प्रथमदर्शनी हा सिलेंडरचा स्फोट झाल्यासारखा दिसत आहे. बॉम्बस्फोटाचे पथक स्फोटाचे कारण शोधण्यासाठी येत आहे.
4-5 people have reportedly been injured after an explosion at a 4-storey building opposite the Karachi University Maskan gate in Gulshan-e-Iqbal. The police are determining the nature of the blast: Pak Media
— ANI (@ANI) October 21, 2020