अमेरिकेकडून भारताला मोठा धक्का, चीनविरोधी ऑकस आघाडीत सहभागी करून घेण्यास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 05:49 PM2021-09-23T17:49:30+5:302021-09-23T17:51:20+5:30

India-US News: गेल्या काही वर्षांमध्ये आशिया खंडात भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष तीव्र झालेला आहे. मात्र असे असले तरी चीनबाबत अमेरिकेने भारताला मोठा धक्का दिला आहे.

Big blow to India from US, refusal to join the anti-China aukus Alliance | अमेरिकेकडून भारताला मोठा धक्का, चीनविरोधी ऑकस आघाडीत सहभागी करून घेण्यास दिला नकार

अमेरिकेकडून भारताला मोठा धक्का, चीनविरोधी ऑकस आघाडीत सहभागी करून घेण्यास दिला नकार

Next

वॉशिंग्टन/नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांमध्ये आशिया खंडात भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष तीव्र झालेला आहे. मात्र असे असले तरी चीनबाबत अमेरिकेने भारताला मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेने भारत आणि जपानला ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसोबत मिळून हिंदी-पॅसिफिकच्या सुरक्षेसाठी बनवलेल्या त्रिपक्षीय आघाडी ऑकसमध्ये सहभागी करून घेण्यास नकार दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी १५ सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन  आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासोबत हिंदी-पॅसिफिकच्या सुरक्षेसाठी एका त्रिपक्षीय आघाडीची ऑकसची घोषणा केली होती. (Big blow to India from US, refusal to join the anti-China aukus Alliance)

या आघाडीनंतर आता ऑस्ट्रेलियाला अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्यांचा पुरवठा केला जाणार आहे. या संदर्भात बुधवारी व्हाईट हाऊसमधील प्रेस सचिव जेन साकी यांनी सांगितले की, ऑकसच्या घोषणेवेळी राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी जे सांगितले ते सांकेतिक नव्हते. मला वाटते की, त्यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉ यांना स्पष्टपणे सांगितले की, ऑकसमध्ये आता कुठल्याही अन्य देशाला सहभागी करून घेता येणार नाही. 

दरम्यान, २४ सप्टेंबरपासून क्वाड शिखर संमेलन सुरू होणार आहे. तसेच यावेळी अमेरिका याचे यजमानपद भूषवत आहे. या संमेलनापूर्वी भारताला या ऑकस सुरक्षा आघाडीचा भाग बनवले जाईल, अशी अपेक्षा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वाड संमेलनामध्ये भाग घेण्यासाठी अमेरिकेत दाखल झाले आहेत. ते तीन दिवस अमेरिकेत राहतील. यादरम्यान, मोदी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्याशीही चर्चा करणार आहेत.

अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनच्या या सुरक्षा आघाडीकडे हिंदी-पॅसिफिक भागात चीनचा सामना करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. अमेरिका आणि यूके ऑस्ट्रेलियाला अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या विकसित करण्याचे तंत्रज्ञान पुरवतील, हे पहिल्यांदाच घडणार आहे. ऑकसबाबत चीनने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या आघाडीला कुठलेही भवितव्य नसल्याचा  टोला चीनने लगावला आहे.  

Web Title: Big blow to India from US, refusal to join the anti-China aukus Alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.