तालिबानला मोठा धक्का, अफगाणिस्तान सोडण्यापूर्वी शेकडो विमानांसह सर्व शस्त्रांना अमेरिकेने केले निष्क्रीय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 09:27 PM2021-08-31T21:27:02+5:302021-08-31T21:33:13+5:30
US leaves Afghanistan : अमेरिकन सैन्यानं निष्क्रीय केलेलं कुठलंच शस्त्र तालिबानला वापरता येणार नाही.
वॉशिंग्टन: अमेरिकेने 20 वर्षानंतर सोमवारी रात्री अफगाणिस्तानातून माघार घेतली. आता अफगाणिस्तानवर पूर्णपणे तालिबानची सत्ता असणार आहे. दरम्यान, काबुल विमानतळ सोडण्यापूर्वी अमेरिकन लष्कराने त्यांच्या सर्व लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि सशस्त्र वाहने (मिल्ट्री एअरक्राफ्ट, आर्मर्ड व्हेइकल्स) निष्क्रीय केली आहेत. आता या सर्व वस्तु तालिबानच्या हाती लागल्या तरी, त्यांचा वापर तालिबानला करता येणार नाही.
https://t.co/cXyWL8s56y
— Lokmat (@MiLOKMAT) August 31, 2021
सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ अफगाणिस्तानातील कंधारमधील असल्याची माहिती आहे.#afghanistan#taliban
सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल केनेथ मॅकेन्झी यांनी सांगितल्यानुसार, अमेरिकन लष्कराने काबुल विमानतळ सोडण्यापूर्वी हाय-टेक रॉकेट डिफेन्स सिस्टीमसह लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि सशस्त्र वाहने (मिल्ट्री एअरक्राफ्ट, आर्मर्ड व्हेइकल्स) निष्क्रीय केली आहेत. आता
हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर असलेली विमाने आणि इतर वस्तुंचा कोणत्याही लष्करी कार्यात वापर करता येणार नाही.
https://t.co/TXYrituI02
— Lokmat (@MiLOKMAT) August 31, 2021
15 ऑगस्ट रोजी काबुल ताब्यात येताच अफगाणिस्तानात तालिबान राजवटीची सुरुवात झाली. #Afghanistan
मॅकेन्झी यांनी पुढे सांगितले की, अमेरिकन सैन्याने शस्त्रांसह काबुल विमानतळाच्या सुरक्षेसाठी लावलेल्या रॉकेट डिफेंस सिस्टीमलाही बंद केले आहे. याच सिस्टीमच्या मदतीने सोमवारी काबुल विमानतळावरील 5 रॉकेट हल्ल्यांना परतून लावले होते. आता ही सिस्टीमही बंद केल्यामुळे तालिबानच्या हाती या वस्तु लागल्या तरी, त्यांना याचा कुठल्याच लष्करी कार्यात वापर करता येणार नाही.