Imran Khan Panjashir: पंजशीरवर पाकिस्तान-तालिबानमध्ये मोठी डील; इम्रान खानने केले कबूल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 06:57 PM2021-10-01T18:57:16+5:302021-10-01T19:05:44+5:30

Taliban Pakistan deal on Panjashir: तालिबान यामध्ये मदत करतोय का असा प्रश्न विचारला असता, इम्रान खान यांनी स्पष्टपणे सांगितले ही चर्चा अफगाणिस्तानमध्येच होत आहे. त्यामुळे तालिबान मदत करत आहे. टीटीपीच्या काही गटासोबत चर्चा सुरु आहे. 

Big deal between Pakistan and Taliban on Panjshir; Imran Khan confessed | Imran Khan Panjashir: पंजशीरवर पाकिस्तान-तालिबानमध्ये मोठी डील; इम्रान खानने केले कबूल

Imran Khan Panjashir: पंजशीरवर पाकिस्तान-तालिबानमध्ये मोठी डील; इम्रान खानने केले कबूल

Next

इस्लामाबाद : अफगाणिस्तानवर कब्जा करण्यासाठी तालिबानलापाकिस्तानने मदत केल्याचे आरोप होत आहेत. परंतू पाकिस्तानने ते उघड उघड कबुल केले नव्हते. मात्र, पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खानने स्वत:च कबुल केले आहे. एका मुलाखतीमध्ये इम्रान खान यांनी तालिबानसोबत असलेल्या संबंधांचा खुलासा केला आहे. (Taliban Pakistan deal on Panjashir attack for TTP.)

पाकिस्तानमध्ये दहशतवाद पसरविणाऱ्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) सोबत चर्चा सुरु आहे. यामध्ये अफगाणिस्तान तालिबान मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानला या संघटनेने पुरते हतबल केले आहे. यामुळे पाकिस्तानने पंजशीरमध्ये मदतीच्या बदल्यात पाकिस्तानी तालिबान संपविण्यासाठी डील केल्याचे समोर आले आहे. 

इम्रान खान याने TRT वर्ल्डला मुलाखत दिली. यामध्ये पाकिस्तानी तालिबानी संघटना शांतीसाठी चर्चा करत आहे. टीटीपीमध्ये अनेक भाग आहेत. त्यांच्यासोबत आत्मसमर्पण करण्यावर चर्चा केली जात आहे. त्यांनी जर शस्त्रे टाकली तर त्यांना आम्ही माफ करू आणि सामान्य नागरिकांसारखी वागणूक देऊ, असेही ते म्हणाले. 

तालिबान यामध्ये मदत करतोय का असा प्रश्न विचारला असता, इम्रान खान यांनी स्पष्टपणे सांगितले ही चर्चा अफगाणिस्तानमध्येच होत आहे. त्यामुळे तालिबान मदत करत आहे. टीटीपीच्या काही गटासोबत चर्चा सुरु आहे. 

पंजशीरबाबत काय घडले...
आयएसआयएस चिफ जेव्हा काबुलमध्ये गेला तेव्हाच पाकिस्तानने पंजशीरमध्ये हवाई हल्ला केला. या बदल्यात तालिबानने टीटीपीवर काबू मिळविण्याचे आश्वासन दिले होते. तालिबानने पाकिस्तानची चिंता योग्य असून त्याची काळजी घेतली जाईल असे म्हटले आहे. 

Web Title: Big deal between Pakistan and Taliban on Panjshir; Imran Khan confessed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.