समुद्रात मोठी घटना! ३००० कार घेऊन जाणारे मालवाहू जहाज पेटले; भारतीयाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 01:54 PM2023-07-27T13:54:10+5:302023-07-27T13:54:38+5:30

पुढील काही दिवस ही आग धगधगत राहिल अशी शक्यता नेदरलँडच्या तटरक्षक दलाने व्यक्त केली आहे. 

Big incident at sea! A cargo ship carrying 3,000 cars caught fire; Death of an Indian crew employee | समुद्रात मोठी घटना! ३००० कार घेऊन जाणारे मालवाहू जहाज पेटले; भारतीयाचा मृत्यू

समुद्रात मोठी घटना! ३००० कार घेऊन जाणारे मालवाहू जहाज पेटले; भारतीयाचा मृत्यू

googlenewsNext

समुद्रात मोठी घटना घडली आहे. सुमारे तीन हजार कार घेऊन जाणाऱ्या कारला भीषण आग लागली आहे. यामध्ये एका भारतीयाचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. तसेच २० जण जखमी झाले आहेत. नेदरलँडच्या समुद्रात ही आग लागली आहे. 

मृत भारतीय नागरिक हा त्या जहाजावरील कर्मचारी होती. ही आग विझविण्यास कठीण आहे. पुढील काही दिवस ही आग धगधगत राहिल अशी शक्यता नेदरलँडच्या तटरक्षक दलाने व्यक्त केली आहे. 

199 मीटर लांब असेलेले पनामाचे मालवाहू जहाज फ्रीमँटल हायवे जर्मनी ते इजिप्तला जात होते. मंगळवारी रात्री नेदरलँड्सच्या किनार्‍याजवळ जहाजाला आग लागली. या अपघातात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती नेदरलँडमधील भारतीय दूतावासाने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. मृतांच्या नातेवाईकांच्या संपर्कात असून लवकरच मृतदेह भारतात पाठवला जाईल, असे पुढे म्हटले आहे. 

याचबरोबर अन्य २० जखमी देखील भारतीय असण्याची शक्यता आहे. अपघातात जखमी झालेल्या 20 लोकांच्या संपर्कात आहेत आणि त्यांना मालवाहू जहाज चालवणाऱ्या कंपनीच्या समन्वयाने आवश्यक ती सर्व मदत दिली जात आहे, असे दुतावासाने म्हटले आहे. 

आग विझवण्यास अजून काही दिवस लागतील असे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाचे जवान जहाजावर जाऊ शकलेले नाहीत. धुराचे प्रमाण खूप असल्याने बाहेरूनच मशीनच्या सहाय्यानेबंदीस्त जहाजावर पाण्याचा फवारा करण्यात येत आहे. याचबरोबर जहाजात पाणी भरल्याने ते बुडण्याचाही धोका आहे.
 

Web Title: Big incident at sea! A cargo ship carrying 3,000 cars caught fire; Death of an Indian crew employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग