मोठी बातमी! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवडणुकीतून माघार; पत्र लिहून घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 06:58 AM2024-07-22T06:58:42+5:302024-07-22T06:59:02+5:30

गेल्या काही दिवसांपासून बायडेन यांची प्रकृती आणि बोलण्यातील चुका पाहून लोक त्यांच्या उमेदवारीवर चर्चा करत होते. डिबेटमध्ये देखील बायडेन ट्रम्प यांच्यापासून पिछाडीवर पडत चालले होते.

Big news! US President joe Biden withdraws from election; Declaration by letter  | मोठी बातमी! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवडणुकीतून माघार; पत्र लिहून घोषणा 

मोठी बातमी! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवडणुकीतून माघार; पत्र लिहून घोषणा 

वाढलेले वय आणि बोलण्यातील चुका यामुळे वादात असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अखेर राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. बायडेन यांनी पत्र लिहून याची घोषणा केली आहे. पुढील आठवड्यात बायडेन लोकांना संबोधितही करणार आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून बायडेन यांची प्रकृती आणि बोलण्यातील चुका पाहून लोक त्यांच्या उमेदवारीवर चर्चा करत होते. डिबेटमध्ये देखील बायडेन ट्रम्प यांच्यापासून पिछाडीवर पडत चालले होते. अशातच भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांना उमेदवार केले जावे अशीही मागणी जोर धरत होती. परंतू, या चर्चांवर बायडेन यांनी अनेकदा आपण काहीही झाले तरी उमेदवारी मागे घेणार नाही, असे स्पष्टीकरण दिले होते. 

राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत लाईव्ह डिबेटचा एक महत्वाचा टप्पा असतो. यामध्ये ते ट्रम्प यांच्याविरोधात अनेकदा चर्चा करतेवेळी अचानक थांबले होते. यामुळे ट्रम्प ताकदवर होताना दिसत होते. अशावेळी बायडेन यांना राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीतून बाजुला करावे अशी मागणी होत होती. अखेर रविवारी बायडेन यांनी पक्षाच्या आणि देशाच्या हितासाठी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. 

बायडेन यांचे वय ८१ वर्षे असून त्यांचा विरसभोळेपणा वाढत चालला होता. यामुळे ते खूप अॅक्टीव्ह दिसत नव्हते. या कारणाने त्यांचे समर्थकही निराश झाले होते. आता डेमोक्रेट पार्टीकडून कमला हॅरीस यांना राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार बनविले जाऊ शकते. याची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. 

यावेळी बायडेन यांनी कमला हॅरीस यांना समर्थन दिले आहे. मी नामनिर्देशन न स्वीकारण्याचा आणि माझ्या उर्वरित कार्यकाळासाठी राष्ट्राअध्यक्ष म्हणून माझ्या कर्तव्यांवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. 2020 मध्ये राष्ट्राच्या उप राष्ट्रपती पदी कमला हॅरिस यांना नामनिर्देशित करणे हा मी घेतलेला सर्वोत्तम निर्णय होता, असे बायडेन म्हणाले. 

Web Title: Big news! US President joe Biden withdraws from election; Declaration by letter 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.