मोठा खुलासा : कोरोना किती घातक याची चिनी डॉक्टरांना आधीपासूनच कल्पना; खोटं बोलण्यासही प्रवृत्त केलं

By जयदीप दाभोळकर | Published: January 20, 2021 09:31 AM2021-01-20T09:31:19+5:302021-01-20T09:36:46+5:30

चीनच्या भूमिकेवर पुन्हा उपस्थित झालं प्रश्नचिन्ह

Big revelation on wuhan corona virus doctors in china silenced over true coronavirus origin in documentary | मोठा खुलासा : कोरोना किती घातक याची चिनी डॉक्टरांना आधीपासूनच कल्पना; खोटं बोलण्यासही प्रवृत्त केलं

मोठा खुलासा : कोरोना किती घातक याची चिनी डॉक्टरांना आधीपासूनच कल्पना; खोटं बोलण्यासही प्रवृत्त केलं

Next
ठळक मुद्देचीनच्या भूमिकेवर पुन्हा उपस्थित झालं प्रश्नचिन्हप्रसाराबाबत रुग्णालयांनाही माहिती देण्यास करण्यात आला होता मज्जाव, डॉक्टरांचा दावा

कोरोना विषाणूनं जगभरात हाहाकार माजवला होता. कोरोना विषाणूच्या प्रसारावरून अनेकदा चीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. परंतु चीननं हे आरोप फेटाळण्याचे पुरेपूर प्रयत्न केले होते. कोरोनामुळे आतापर्यंत जवळपास साडेनऊ कोटी लोकांना आपला जीव गमवाला लागला आहे. अमेरिका, ब्रिटन अशा ताकदवान देशांमध्येही कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला होता. तसंच आरोग्य व्यवस्थेवरही मोठा ताण आला होता. परंतु चीनच्या काही डॉक्टरांनी छुप्या कॅमेऱ्यासमोर काही तथ्य मांडली आहेत. ज्यामुळे पुन्हा एकदा चीनच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं आहे.

कोरोना विषाणू हा किती घातक आहे याची पहिल्यापासूनच कल्पना होती असं काही चिनी आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितलं असल्याचा दावा ब्रिटनची न्यूज वेबसाईच मिररनं केला. कोरोना किती घातक आहे, त्याचा किती वेगानं प्रसार होऊ शकतो याची कल्पना आरोग्य कर्मचाऱ्यांना होती. परंतु त्यांना खोटं बोलण्यास सांगण्यात आलं होतं. डिसेंबर २०१९ मध्येच हा विषाणू किती भयावह असू शकतो याची कल्पना आली होती. या विषाणूमुळे लोकांचे प्राणही जात असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेला जानेवारी महिन्याच्या मध्यावधीत देण्यात आली. हा विषाणू किती तेजीनं एकातून दुसऱ्या व्यक्तीत प्रवेश करतो हेदेखील रुग्णालयांना सांगण्यास मनाई केली होती, असं डॉक्टरांनी छुप्या कॅमेऱ्यासमोर सांगितलं.

कोरोना विशाणूच्या पार्श्वभूमीवर चीनमधील बिघडतं वातावरण पाहता नव्या वर्षाच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु अधिकाऱ्यांनी त्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. ITV वर प्रदर्शित करण्यात आलेल्या 'आउटब्रेक: द व्हायरस दॅट शूक द वर्ल्ड' या डॉक्युमेंट्रीमध्ये वुहानमधील डॉक्टरांनी सत्य मांडलं आहे. त्यांच्या सुरक्षेकडे पाहता त्यांचे चेहरे लपवण्यात आले आहेत. छुप्या कॅमेऱ्यांसमोर डॉक्टरांनी केलेल्या अनेक दाव्यांमुळे पुन्हा एकदा चीनच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. 

"डिसेंबर अखेरिस अथवा जानेवारीच्या सुरूवातीला माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीच्या कुटुंबातील एकाचा या विषाणूमुळे मृत्यू झाला होता. माझ्या ओळखीच्या व्यक्तीसहित त्याच्या कुटुंबातील सर्वांनाचा कोरोनाची बाधा झाली होती," अशी माहिती एका डॉक्टरनं बोलताना दिली. दरम्यान, चीननं १२ जानेवारी रोजी जागतिक आरोग्य संघटनेला या विषाणूचा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे प्रसार होत असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचा दावा केला होता. 

Web Title: Big revelation on wuhan corona virus doctors in china silenced over true coronavirus origin in documentary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.