चीनला मोठा धक्का? लँडिंग दरम्यान रॉकेटचा स्फोट, मोठे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 03:25 PM2024-09-23T15:25:54+5:302024-09-23T15:30:20+5:30
चीनमध्ये एका रॉकेटची व्हर्टिकल टेकऑफ आणि लँडिंग चाचणी केली जात होती. लँडिंग दरम्यान रॉकेटचा स्फोट झाला.
चीनमध्ये चाचणीदरम्यान एका रॉकेटचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. नेबुला-1 नावाचे हे रॉकेट चिनी कंपनी डीप ब्लू एरोस्पेसचे आहे. या रॉकेटची व्हर्टिकल टेकऑफ आणि लँडिंग चाचणी केली जात होती. लँडिंग दरम्यान रॉकेटचा स्फोट झाला. याबाबत आता कंपनीने प्रतिक्रिया दिली. या प्रोजेक्टमध्ये ठेवलेल्या ११ पैकी १० उद्दिष्टे पूर्ण केली असल्याचे कंपनीचे म्हणणे आहेत. डीप ब्लू कंपनी पुन्हा वापरता येण्याजोग्या रॉकेट तंत्रज्ञानावर काम करत आहे. खूप उंचीवर झालेली ही चाचणी कंपनीच्या याच प्रयत्नांचा एक भाग होता असंही त्यांनी म्हटले आहे.
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
नेब्युला-1 रॉकेटने आपली उड्डाण करण्याची क्षमता दाखवून यशस्वीपणे लक्ष्य उंची गाठली. लँडिंग दरम्यान, रॉकेटला अडचणी आल्या. यामुळे त्याला अपयशाला सामोरे जावे लागले. हा धक्का असूनही, कंपनीचे म्हणणे आहे की, त्यांची बहुतेक ध्येये पूर्ण झाली आहेत. हे विश्वसनीय स्पेसफ्लाइट तंत्रज्ञान विकसित करण्यात कंपनीची प्रगती दर्शवते.
डीप ब्लू एरोस्पेसने चाचणी उड्डाण कॅप्चर करणारे ड्रोन फुटेज जारी केले. त्यात रॉकेटच्या उड्डाणाचे आणि त्याच्या लँडिंगचे दृश्य टिपले आहे. या व्हिडीओत हे रॉकेट वरती जाऊन स्फोट झाल्याचे दिसत आहे. शेवटी ते सुरक्षितपणे उतरण्यात अपयशी ठरले.
ही रॉकेट चाचणी डीप ब्लू एरोस्पेससाठी महत्त्वाची स्टेप आहे. चीनमधील व्यावसायिक अंतराळ प्रवासाला प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश आहे. कंपनी त्यांच्या नेबुला सीरिजच्या रॉकेटसाठी पैसे आणि समर्थन उभारत आहे. हे रॉकेट पुन्हा वापरण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहेत.