COVID-19 Lab Leak: “मी वुहान लॅबसोबत काम केलंय, कोरोना तिकडूनच लीक झाला..,” अमेरिकन वैज्ञानिकाचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 08:01 PM2022-12-03T20:01:59+5:302022-12-03T20:02:51+5:30

चीनच्या वुहान लॅबमध्ये जवळून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने कोविड विषाणूच्या उत्पत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे.

biggest-cover-up-in-history-on-origin-of-covid-virus-us-scientist-claims-i-worked-with-wuhan-lab-covid-was-a-lab-leak-corona-china-america-jinping | COVID-19 Lab Leak: “मी वुहान लॅबसोबत काम केलंय, कोरोना तिकडूनच लीक झाला..,” अमेरिकन वैज्ञानिकाचा मोठा गौप्यस्फोट

COVID-19 Lab Leak: “मी वुहान लॅबसोबत काम केलंय, कोरोना तिकडूनच लीक झाला..,” अमेरिकन वैज्ञानिकाचा मोठा गौप्यस्फोट

Next

चीनच्या वुहान लॅबमध्ये जवळून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने कोविड विषाणूच्या उत्पत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे. कोविड विषाणू जेनेटिकली इजिनिअर्ड होता असा दावा कर्मचाऱ्यानं केला आहे. वुहान लॅबमधूनच हा व्हायरस लीक झाल्याचेही त्यांनी सांगितले. वुहान इंस्टिट्युट ऑफ वायरॉलॉजीमधून हा विषाणू लीक झाल्याचा आरोप इकोहेल्थ अलायन्सचे माजी व्हाईस प्रेसिडेंट डॉ. अँड्र्यू हफ यांनी केला आहे. कोरोना महासाथीच्या सुरुवातीपासूनच अमेरिकन प्रशासन या विषाणूसाठी चीनला जबाबदार धरत आहे. मात्र, चीनने नेहमीच हे आरोप फेटाळून लावले आहेत.

“कोरोनाची महासाछी भयानक जेनेटिक इंजिनिअरिंगचा परिणाम होती. या लॅबला अमेरिकन सरकारकडून मोठ्या प्रमाणात फंडिंग मिळालं होतं. इकोहेल्थ अलायन्स आणि परदेशी प्रयोगशाळांमध्ये योग्य जैवसुरक्षा आणि जोखीम व्यवस्थापनासाठी पुरेसे नियंत्रण उपाय नव्हते. याचा परिणाम म्हणून वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या प्रयोगशाळेतून हा धोकादायक विषाणू बाहेर पडला,” असा दावा हफ यांनी आपलं पुस्तक ‘द ट्रुथ अबाऊट वुहान’ या पुस्तकातून केला आहे.

वुहान लॅब सोबत काम
डॉ. हफ यांनी २०१४ ते २०१६ पर्यंत इकोहेल्थ अलायन्समध्ये काम केलं आहे. २०१५ मध्ये त्यांना या कंपनीचे उपाध्यक्ष बनवण्यात आले. अमेरिकन सरकारचे शास्त्रज्ञ म्हणून ते या संशोधन कार्यक्रमावर गुप्तपणे काम करत होते. ते म्हणाले की, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या निधीतून इकोहेल्थ अलायन्स दहा वर्षांहून अधिक काळ वटवाघुळांमध्ये आढळणाऱ्या विविध प्रकारच्या कोरोना विषाणूंचा अभ्यास करत आहे. हे काम करत असताना त्यांचे आणि चीनच्या वुहान लॅबमध्ये खूप जवळचं नातं निर्माण झालं होतं.

चीनला कोरोनाबाबत माहिती होती
कोरोना विषाणू जेनेटिकली इंजिनिअर्ड विषाणू आहे हे चीनला पहिल्या दिवसापासून माहित होते. बायोटेक्नॉलॉजीच्या हस्तांतरणासाठी अमेरिकन सरकारही दोषी आहे, असा दावा त्यांनी केला आहे. द सनशी बोलताना डॉ हफ म्हणाले की त्यांनी जे पाहिले ते पाहून भीती वाटली. आम्ही त्यांच्याकडे जैविक शस्त्रांचे तंत्रज्ञान सुपूर्द केले. ‘काही लोभी शास्त्रज्ञांनी जगभरातील लाखो लोकांचा बळी घेतला. SARS-CoV-2 च्या प्रादुर्भावाबद्दल चिनी लोक खोटे बोलले याचे कोणालाही आश्चर्य वाटू नये,’ असा दावाही त्यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

Web Title: biggest-cover-up-in-history-on-origin-of-covid-virus-us-scientist-claims-i-worked-with-wuhan-lab-covid-was-a-lab-leak-corona-china-america-jinping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.