फेसबुकवर सर्वात मोठा सायबर हल्ला; 5 कोटी युजर्सची माहिती चोरली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 10:49 PM2018-09-28T22:49:12+5:302018-09-29T08:09:52+5:30

फेसबुकला आठवड्याच्या सुरुवातीलाच या सायबर हल्ल्याची माहिती मिळाली. फेसबुकच्या कोडमध्ये बदल करून वापरकर्त्यांची माहिती चोरल्याचे उघड झाले आहे.

The biggest cyber attack on Facebook; 5 million users information stolen | फेसबुकवर सर्वात मोठा सायबर हल्ला; 5 कोटी युजर्सची माहिती चोरली

फेसबुकवर सर्वात मोठा सायबर हल्ला; 5 कोटी युजर्सची माहिती चोरली

googlenewsNext

सॅन फ्रान्सिस्को : सोशल मीडियावर प्रभावी असलेल्या नेटवर्किंग साईट फेसबुकच्या कॉम्प्युटर नेटवर्कवर झालेल्या सायबर हल्ल्यामध्ये जवळपास 5 कोटी युजर्सची माहिती लीक झाल्याची शक्यता आहे. फेसबुकनेच शुक्रवारी ही माहिती दिली आहे. फेसबुकला आठवड्याच्या सुरुवातीलाच या सायबर हल्ल्याची माहिती मिळाली. फेसबुकच्या कोडमध्ये बदल करून वापरकर्त्यांची माहिती चोरल्याचे उघड झाले आहे. फेसबुकने या प्रकरणी अंमलबजावणी अधिकाऱ्यांना याची तक्रार दिली आहे. तसेच या कोडमध्ये दुरुस्ती केली आहे. 

फेसबुकने या हल्ल्यापासून होणारे नुकसान कमी करण्यासाठी शुक्रवारी सकाळी 9 कोटी युजर्सना बळजबरीने लॉगआऊट करण्यास भाग पाडले. हा हल्ला कोठून झाला याबाबत फेसबुकला अद्याप शोध लावता आलेला नसून हल्ल्याची व्याप्तीही समजलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

जगभरातल्या जवळपास 5 कोटी युजर्सना याचा फटका बसला आहे, परंतु देशागणिक आकडेवारी उपलब्ध नसल्याचे फेसबुकने आयर्लंडमधील डेटा नियामक संस्थेला माहिती दिली आहे. कंपनीने युजर्सना लॉग आऊट करून पुन्हा लॉग इन करण्यात सांगितले आहे. तसेच युजर्सनं पासवर्ड बदलण्याची गरज नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाचा आमच्याकडून तपास सुरू आहे. हॅक करण्यात आलेल्या अकाऊंटची माहिती चोरली का, त्याचा गैरवापर झाला का, याची अद्याप पुष्टी झालेली नाही, असं कंपनीनं म्हणणं आहे. आमच्यासाठी युजर्सची सुरक्षा आणि प्रायव्हसी अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे जे घडलं त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत, असं म्हणत फेसबुकनं युजर्सची माफी मागितली आहे. 

Web Title: The biggest cyber attack on Facebook; 5 million users information stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.