द्विपक्षीय संबंध दृढ होतील

By admin | Published: May 13, 2015 10:36 PM2015-05-13T22:36:34+5:302015-05-13T22:36:34+5:30

चीनच्या आगामी दौऱ्याने द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील. तसेच आशियातील विकसनशील देशांसोबत जागतिक संबंधाच्या दृष्टी चीनचा

Bilateral relations will be strengthened | द्विपक्षीय संबंध दृढ होतील

द्विपक्षीय संबंध दृढ होतील

Next

बीजिंग : चीनच्या आगामी दौऱ्याने द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील. तसेच आशियातील विकसनशील देशांसोबत जागतिक संबंधाच्या दृष्टी चीनचा दौरा नवीन मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
गुरुवारपासून पंतप्रधान मोदी तीन दिवसांच्या चीनच्या दौऱ्यावर रवाना होत असून त्यानंतर ते मंगोलिया आणि दक्षिण कोरियाचाही दौरा करणार आहेत. मोदी यांच्या चीनच्या दौऱ्याकडे जगाचे लक्ष असून सीमावाद आणि पाकव्याप्त काश्मीरमधील चीनचा पायाभूत प्रकल्प यासारख्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसांच्या चीन दौऱ्यावर जात आहेत.
चीनच्या दौऱ्यावर जाण्याआधी मोदी यांनी चीन सरकारच्या ‘सीसीटीव्ही’ दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, चीनच्या दौऱ्यामुळे भारत-चीन मैत्री आणि द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील, यात शंकाच नाही.
२१ वे शतक आशियाचे आहे. या शतकात आपण स्वातंत्र्यासाठी लढू शकतो. जागतिक शांतता आणि स्थैर्यासाठी भारत आणि चीनने एकत्र काम करण्याची गरज असून काळाचीही तशी मागणी आहे. द्विपक्षीय संबंधात बरीच प्रगती झाली आहे. दोन्ही देशांनी धैर्याने आणि प्रगल्भतेने आपसातील मतभेद दूर करण्याचे प्रयत्न केले आहेत.
शांततेच्या मार्गाने सीमावाद सोडविण्याच्या प्रयत्नासह दोन्ही देशांनी विविध आंतरराष्ट्रीय आणि विभागीय मुद्यांवर समझोतेही केले आहेत, असेही मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. गुरुवारी मोदी चीनमध्ये शाक्शी आणि जियानला पोहोचतील. सायंकाळी बीजिंगला जाण्यापूर्वी ते चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी औपचारिक चर्चा करतील. दुसऱ्या दिवशी चीनचे पंतप्रधान ली क्वियांग यांच्याशी चर्चा केल्यांतर ते शांघाईकडे रवाना होतील. तेथे उद्योगपतींच्या बैठकीत मार्गदर्शन करतील. याशिवाय ते फ्युडा विद्यापीठातील महात्मा गांधी अध्यासनाचे उद्घाटन करून भारतीय समुदायाशी संवाद साधतील.

Web Title: Bilateral relations will be strengthened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.