अब्जाधीश बिल गेट्स यांच्या मुलीने इजिप्तच्या नासरसोबत केलं लग्न, जाणून घ्या किती झाला खर्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 15:26 IST2021-10-18T15:22:57+5:302021-10-18T15:26:00+5:30
Bill Gates daughter Jennifer marriage : जेनिफरने इजिप्तच्या ३० वर्षीय घोडेस्वार नयेल नासरसोबत लग्न केलं. जेनिफर आणि नासरच्या लग्नाच्या आनंदात शनिवारी दुपारी एका रिसेप्शन पार्टीचंही आयोजन करण्यात आलं होतं.

अब्जाधीश बिल गेट्स यांच्या मुलीने इजिप्तच्या नासरसोबत केलं लग्न, जाणून घ्या किती झाला खर्च
मायक्रोसॉफ्टची उत्तराधिकारी आणि अब्जाधीश बिल गेट्स (Bill Gates) -मेलिंडा गेट्स यांची मोठी मुलगी जेनिफर गेट्सने एका खाजगी समारंभात लग्न (Bill Gates daughter Jennifer marriage) केलं. जेनिफरने इजिप्तच्या ३० वर्षीय घोडेस्वार नयेल नासरसोबत लग्न केलं. जेनिफर आणि नासरच्या लग्नाच्या आनंदात शनिवारी दुपारी एका रिसेप्शन पार्टीचंही आयोजन करण्यात आलं होतं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेनिफर आणि नासर यांनी शुक्रवारी लग्न केलं. पण हे लग्न त्यांनी फारच सीक्रेट ठेवलं. हा लग्नसोहळा न्यूयॉर्कच्या नॉर्थ सलेम येथील १४२ एकरच्या प्रॉपर्टी गार्डनमध्ये पार पडडला. ज्यात साधारण ३०० लोक सहभागी झाले होते. २०१७ पासून जेनिफर नासरला डेट करत होती. दोघांनी शिक्षणही एकत्र पूर्ण केलं. २०२० मध्ये एका ट्रिपदरम्यान त्यांनी त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली होती. जेनिफर ख्रिश्चन आहे तर नासर मुस्लिम. मात्र, दोघांनीही प्रेमात धर्माची सीमा आड येऊ दिली नाही.
'Jennifer Gates poses for photos with her new husband Nayel Nassar and her billionaire parents Bill and Melinda Gates as she celebrates her wedding at her 142-acre, $16 million North Salem farm in a reported $2million ceremony.' https://t.co/EjQVaPj1uupic.twitter.com/gdEmxl2M0a
— Nina Brooke (@NinaBrooke3) October 17, 2021
शनिवारी झालेल्या या रिसेप्शननंतर बिल गेट्स यांनी मुलगी जेनिफरसोबत एल्टन जॉनच्या गाण्यावर डान्सही केला. लग्नात जेनिफरने एक कस्टम वेरा वॅंग गाउन घातला होता.
बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांनी आपल्या २५ वर्षीय जेनिफला एकत्र सेरेमनी पॉइंटपर्यंत सोडलं. सायंकाळी साधारण ४ वाजता रिसेप्शन प्रोग्राम सुरू झाला. यावेळी बिल गेट्स एक डार्क सूट घालून होते आणि मेलिंडा एक पर्पल कलरचा गाउन घालून होत्या. सायंकाळी ५ वाजता दोघांनी लग्नाची घोषणा केली. रिसेप्शननंतर दोघांचं गार्डनमधील सुंदर ठिकाणांवर फोटोशूट करण्यात आलं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार रिसेप्शनमध्ये केवळ जवळच्या मित्रांना आणि नातेवाईकांना बोलवण्यात आलं होतं. यात काही खास सेलिब्रिटी आणि राजकीय नेते होते. अब्जाधीश मायकल ब्लूमबर्गची मुलगी जॉर्जिया ब्लूमबर्गही या रिसेप्शनमध्ये होती. शुक्रवारी रात्रीचं फंक्शन फारच सीक्रेट ठेवण्यात आलं होतं.
या दोन दिवसांच्या इव्हेंटची जबाबदारी प्रसिद्ध वेडींग प्लानर मार्सी ब्लमला देण्यात आली होती. या इव्हेंटचा अंदाजे खर्च दोन मिलियन यूएस डॉलर म्हणजे साधारण १५ कोटी रूपये सांगितला जात आहे. दरम्यान बिल आणि मेलिंडा गेट्स यावर्षी ऑगस्ट महिन्यातच वेगळे झाले होते तरी रिसेप्शनमध्ये दोघांनी पाहुण्यांसोबत वेळ घालवला.