Bill Gates divorce: 27 वर्षे साथ दिली, आता शक्य नाही! अब्जाधीश बिल गेट्स, मेलिंडाकडून घटस्फोटाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 08:06 AM2021-05-04T08:06:36+5:302021-05-04T08:10:53+5:30
Bill Gates and Melinda gates announce divorce: बिल गेट्स आणि मेलिंडा यांचे लग्न 1994 मध्ये झाले होते. ते एकमेकांना 1987 मध्ये पहिल्यांदा भेटले होते. 27 वर्षे एकत्र राहिलेल्या या जोडप्याकडून नातेसंबंध तोडण्याची घोषणा झाल्याने लोकही हैरान झाले आहेत.
जगातील अत्यंत महागडा घटस्फोट अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस आणि मॅकेन्झी बेजोस यांचा घटस्फोट दोन वर्षांपूर्वी झाला. यानंतर आणखी एक खळबळ उडविणारी बातमी अब्जाधीश आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (Bill Gates)दांम्पत्याकडून येत आहे. बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स (Melinda Gates) यांनी २७ वर्षांचे नाते संपविण्याची घोषणा केली आहे. (Billionaire benefactors Bill and Melinda Gates filed for divorce on Monday after 27 years of marriage)
ती सध्या काय करते! अब्जाधीश जेफ बेजोस यांच्या घटस्फोटीत पत्नीने केले एका शिक्षकासोबत लग्न
बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांनी घटस्फोट (Bill Gates and Melinda announce divorce) घेत असल्याची घोषणा केली आहे. पुढील काळात आम्ही एकमेकांसोबत चालू शकत नाही, असे त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे. बिल गेट्स आणि मेलिंडा यांनी एक वक्तव्य जारी केले आहे. बिल गेट्स यांनी ते ट्विटरवर शेअर केले आहे. मोठी चर्चा आणि आपल्या नात्यावर काम केल्यानंतर आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 27 वर्षांमध्ये आम्ही आमच्या तीन मुलांचे संगोपन केले. आम्ही एक फाऊंडेशन देखील बनविले आहे. जे जगभरातील लोकांच्या आरोग्य आणि चांगल्या आयुष्यासाठी काम करते.
— Bill Gates (@BillGates) May 3, 2021
आम्ही या मिशनसाठी पुढेही एकत्र काम करत राहणार आहोत. परंतू आता आम्हाला वाटत आहे की, पुढील काळात पती-पत्नी म्हणून आम्ही एकमेकांना साथ देऊ शकणार नाही. यामुळे आम्ही नवीन आयुष्य सुरु करणार आहोत. यामुळे लोकांकडून आम्हाला आमच्या आयुष्यात हस्तक्षेप न करण्याची अपेक्षा आहे.
बिल गेट्स आणि मेलिंडा यांचे लग्न 1994 मध्ये झाले होते. ते एकमेकांना 1987 मध्ये पहिल्यांदा भेटले होते. 27 वर्षे एकत्र राहिलेल्या या जोडप्याकडून नातेसंबंध तोडण्याची घोषणा झाल्याने लोकही हैरान झाले आहेत. बिल गेट्स यांची ओळख जगातील अब्जाधीश म्हणून आहे. तसेच त्यांनी निवृत्तीनंतर अब्जावधी रुपये दान केले आहेत.