अब्जाधीश बिल गेट्स पडले पुन्हा प्रेमात!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 10:36 AM2023-02-11T10:36:16+5:302023-02-11T10:36:50+5:30
पाउला या सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकलचे दिवंगत सहसीईओ मार्क हर्ड यांच्या पत्नी आहेत.
वॉशिंग्टन : ३० वर्षे एकत्र संसार केल्यानंतर मेलिंडा गेट्स यांच्याशी घटस्फोट घेतलेले मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स हे पुन्हा एकदा प्रेमात पडले आहेत. ६७ वर्षीय अब्जाधीश गेट्स यांचे टेनिसपटू पाउला हर्ड यांच्याशी प्रेमाचे सूत जुळले आहेत. नुकतेच दोघे पुरुष सिंगल्स फायनलदरम्यान ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये दिसून आले. गेल्या वर्षी २३ डिसेंबर रोजीही लंडनमध्ये ते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले होते.
पाउला या सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकलचे दिवंगत सहसीईओ मार्क हर्ड यांच्या पत्नी आहेत. मार्क यांचे २०१९ मध्ये कर्करोगाने निधन झाले होते. पाउला यांना कॅथरिन आणि केली या दोन मुली आहेत.