२२.६ बिलियन डॉलर संपत्तीचा मालक ठरला अरब व्यक्तीमध्ये अव्वल!
By admin | Published: April 7, 2015 05:33 PM2015-04-07T17:33:32+5:302015-04-07T18:48:09+5:30
फोर्ब्सने प्रसिध्द केलेल्या जागतिक १०० श्रीमंत अरब व्यक्तींमध्ये सौदी अरबीयाचे राजे अलवलीद बीन तलाल अल सौद यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - फोर्ब्सने प्रसिध्द केलेल्या जागतिक १०० श्रीमंत अरब व्यक्तींमध्ये सौदी अरबीयाचे राजे अलवलीद बीन तलाल अल सौद यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे. अलवलीद सौद यांच्याकडे तब्बल २२.६ बिलियन डॉलर अर्थात ( १ लाख ४० हजार कोटी रुपये ) कोटींची संपत्ती आहे.
दुस-या स्थानावर जोसेफ साफरा हे असून त्यांच्याकडे १७.३ बिलियन डॉलर इतकी मालमत्ता आहे. टॉप टेन व्यक्तींमध्ये युनायटेड अरब इमिराती (यूएई) तील अल घुराएर परीवार आणि इजिप्तमधील मंसूर आणि साविरीस परीवारांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसापासून कच्च्या तेलांच्या किंमतीमध्ये घसरण झाली असताना सुध्दा अरब देशांतील राजांच्या किंमतीमध्ये वाढ झालेली आहे. २०१४ मध्ये ही मालमत्ता १७४.३७ बिलियन डॉलरवरुन ८.३ बिलियन डॉलर इतकी वाढ झाली आहे. फोर्ब्सने अरब राष्ट्रातील बिलियन डॉलर संपत्ती असलेल्या व्यक्तींचा यामध्ये समावेश केला असून ही संख्या १,८२६ इतकी आहे व त्यांची एकून संपत्ती ही ७.५ ट्रिलियन डॉलर इतकी आहे.