लादेनने पैसा मागे ठेवला जिहादसाठी

By admin | Published: March 2, 2016 02:33 AM2016-03-02T02:33:47+5:302016-03-02T02:33:47+5:30

अल-काईदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याने त्याच्या २ कोटी ९० लाख डॉलर इतक्या रकमेतील बहुतेक रक्कम आंतरराष्ट्रीय जिहादसाठी मागे ठेवली होती

Bin Laden left the money for jihad | लादेनने पैसा मागे ठेवला जिहादसाठी

लादेनने पैसा मागे ठेवला जिहादसाठी

Next

वॉशिंग्टन : अल-काईदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याने त्याच्या २ कोटी ९० लाख डॉलर इतक्या रकमेतील बहुतेक रक्कम आंतरराष्ट्रीय जिहादसाठी मागे ठेवली होती. त्याची वेगवेगळी पत्रे आणि अन्य कागदपत्रे यावरून ही बाब स्पष्ट झाली आहे.
आपल्या मृत्यूनंतर बहुतेक रक्कम आंतरराष्ट्रीय जिहादसाठी वापरावी, असे त्याने लिहून ठेवले आहे.
२०११ मध्ये अमेरिकेच्या कमांडोंनी पाकिस्तानात त्याचा खात्मा केल्यानंतर ११३ दस्तऐवज हाती लागले आहेत. त्यात एक पत्र त्याच्या पैशाच्या वाटपाबाबत आहे. हे पत्र त्याचे मृत्यूपत्र म्हणून समजले जात आहे.

 

 

Web Title: Bin Laden left the money for jihad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.